India Mornings
India Morning
global_news_portal
loading_ticker
News• 22 April 2026•29 views

नागपूर मनपात महत्त्वपूर्ण नियुक्त्या; दुर्बल घटक समितीचे नेतृत्व लक्ष्मी हत्तीठेले यांच्या हाती !

P
Puja Nitnaware
Published in General
Threads
नागपूर मनपात महत्त्वपूर्ण नियुक्त्या; दुर्बल घटक समितीचे नेतृत्व लक्ष्मी हत्तीठेले यांच्या हाती !

नागपूर महानगरपालिका च्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णयांना एकमताने मंजुरी देण्यात आली.

नागपूर : नागपूर महानगरपालिका च्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक महत्त्वपूर्ण प्रशासकीय निर्णयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. महापौर निता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत विविध समित्यांची पुनर्रचना तसेच नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.

सभेत दुर्बल घटक समितीचे गठन करण्यात आले असून, या समितीच्या अध्यक्षपदी भाजपच्या कु. लक्ष्मी चंद्रभूषण हत्तीठेले यांची निवड करण्यात आली. मागास व दुर्बल घटकांशी संबंधित योजनांच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या समितीकडे राहणार आहे.

तसेच नागपूर सुधार प्रन्यास च्या विश्वस्त मंडळावर मनपाचे प्रतिनिधी म्हणून भाजपचे शेषराव गोतमारे यांची नियुक्ती करण्यात आली. या निर्णयालाही सभागृहाची एकमताने मान्यता मिळाली.

याशिवाय मनपाच्या नामनिर्देशित नगरसेवक म्हणून 9 सदस्यांची घोषणा करण्यात आली. यामध्ये भाजप, शिवसेना आणि काँग्रेसच्या प्रतिनिधींचा समावेश असून सर्व नावांना सभागृहात कोणताही विरोध न होता मंजुरी देण्यात आली.

बैठकीदरम्यान शहरातील विकासकामे आणि विविध प्रशासकीय मुद्द्यांवरही चर्चा झाली. सर्व नवनियुक्त सदस्यांचे महापौरांनी स्वागत करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

Tags:#Nagpur Municipal Corporation#Lakshmi Hatthithele#Weaker Section Committee#Nagpur news#Maharashtra news

want_grow

partner_desc

contact_ads
Email: indiamorning01@gmail.com

recommended

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

14 Jan 2026
64
read_more →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

19 Jan 2026
138
read_more →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

23 Mar 2026
29
read_more →
ad_contact_text indiamorning01@gmail.com
India Mornings

India Morning News Let's begin the day, the informed way!

✉ indiamorning01@gmail.com
Threads

Categories

▶ Astha▶ Breaking News▶ Business▶ Crime▶ Editorial▶ Education▶ English▶ Entertainment▶ Health▶ Hindi▶ International▶ Lifestyle▶ Maharashtra▶ Marathi▶ Mumbai▶ Nashik▶ National▶ News▶ Politics▶ Pune▶ Rashi bhavishya▶ Sports▶ Vidharbha▶ weather

Recent Posts

Opposition moves to remove Chief EC Gyanesh Kumar , alleges Bias

📅 April 24, 2026

Heatwave grips Nation, Early Monsoon brings good news

📅 April 24, 2026
Copyright © 2026 India Morning. All Rights Reserved.