India Mornings
India Morning
global_news_portal
loading_ticker
News• 23 April 2026•7 views

बारामती पोटनिवडणूक २०२६ :ही केवळ निवडणूक नाही, दादांना श्रद्धांजली,मतदानानंतर सुनेत्रा पवार भावूक!

P
Puja Nitnaware
Published in General
Threads
बारामती पोटनिवडणूक २०२६ :ही केवळ निवडणूक नाही, दादांना श्रद्धांजली,मतदानानंतर सुनेत्रा पवार भावूक!

राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.

बारामती : राज्यातील बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांतील पोटनिवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या निवडणुकांचे निकाल राज्याच्या पुढील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरणार आहेत.

बारामती मतदारसंघात विशेष भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. त्यांनी आज सकाळी मतदान करत आपला हक्क बजावला.

मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांनी विद्या प्रतिष्ठान परिसरात जाऊन अजित पवार यांना आदरांजली अर्पण केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, बारामतीकर मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडत आहेत आणि ही निवडणूक केवळ राजकीय नसून ‘दादा’ना श्रद्धांजली अर्पण करण्याचा मार्ग ठरत आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, बारामतीकरांनी गेल्या अनेक दशकांपासून पवार कुटुंबाला दिलेला पाठिंबा कायम ठेवला आहे. आजही सर्वांना अजित पवार यांची उणीव तीव्रतेने जाणवत आहे, असे भावनिक शब्दांत त्यांनी व्यक्त केले.

Tags:#Baramati by-election 2026#Sunetra Pawar#Voting#Ajit Pawar#Baramati News

want_grow

partner_desc

contact_ads
Email: indiamorning01@gmail.com

recommended

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

14 Jan 2026
64
read_more →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

19 Jan 2026
139
read_more →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

23 Mar 2026
29
read_more →
ad_contact_text indiamorning01@gmail.com
India Mornings

India Morning News Let's begin the day, the informed way!

✉ indiamorning01@gmail.com
Threads

Categories

▶ Astha▶ Breaking News▶ Business▶ Crime▶ Editorial▶ Education▶ English▶ Entertainment▶ Health▶ Hindi▶ International▶ Lifestyle▶ Maharashtra▶ Marathi▶ Mumbai▶ Nashik▶ National▶ News▶ Politics▶ Pune▶ Rashi bhavishya▶ Sports▶ Vidharbha▶ weather

Recent Posts

Opposition moves to remove Chief EC Gyanesh Kumar , alleges Bias

📅 April 24, 2026

Heatwave grips Nation, Early Monsoon brings good news

📅 April 24, 2026
Copyright © 2026 India Morning. All Rights Reserved.