नागपूर : विधानपरिषद सदस्य डॉ. परिणय फुके यांची महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या (MAFSU), नागपूर येथील कार्यकारी परिषदेच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९६ मधील कलम १२ (२) (चतुर्थ) अंतर्गत करण्यात आली आहे.
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची कार्यकारी परिषद ही विद्यापीठाची सर्वोच्च प्रशासकीय संस्था असून, या परिषदेच्या माध्यमातून विद्यापीठाच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि आर्थिक धोरणांना दिशा दिली जाते. या परिषदेत कुलगुरू, शासनाचे प्रतिनिधी तसेच नियुक्त सदस्यांचा समावेश असतो.
कार्यकारी परिषदेचा कार्यकाळ विद्यापीठाच्या एकूण धोरणात्मक निर्णयांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन, विस्तार सेवा, अभ्यासक्रम विकास, पायाभूत सुविधा उभारणी तसेच पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसायाशी संबंधित विविध योजनांचे मार्गदर्शन व अंमलबजावणी करण्यामध्ये या परिषदेची मोलाची भूमिका असते.डॉ. परिणय फुके यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेच्या कामकाजाला अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
image.png

