India Mornings
India Morning
Global News Portal
Sunday, February 22, 2026
Loading latest news...
News22 February 20269 views

रानडुकरांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; १२ आरोपींना बेड्या!

R
Rutuja
Published in General
रानडुकरांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; १२ आरोपींना बेड्या!

तुमसरमध्ये रानडुकरांची तस्करी करणारी आंतरराज्य टोळी पकडली; 12 आरोपी अटकेत, जिवंत रानडुक्कर व शिकारी साहित्य जप्त.

​नागपूर, भंडारा आणि अर्जुनीतील शिकारी सक्रिय नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील प्रकार

तुमसर : वन्यजीवांची शिकार करून त्यांची राज्याबाहेर तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा नाकाडोंगरी वनविभागाने पर्दाफाश केला आहे. झंजेरीया बिटातील राखीव वनक्षेत्रात सापळा रचून १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, धक्कादायक बाब म्हणजे हे आरोपी नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विविध गावांमधील रहिवासी आहेत.

गस्तीदरम्यान पिकअप व्हॅनचा पाठलाग ​गुरुवारी (दि. १९) पहाटे ५ वाजताच्या सुमारास वनपरिक्षेत्र अधिकारी छगनलाल रहांगडाले आणि त्यांचे पथक शासकीय वाहन घेऊन गस्तीवर होते. झंजेरीया बिटातील व्याघ्रसांध्या तलाव परिसरात संशयास्पद हालचाली दिसल्या. कक्ष क्रमांक ७४ अ मधील राखीव वनाला लागून असलेल्या तलावाजवळ एक 'बोलेरो पिकअप' (एम.एच.४९ बी.झेड. ७१०४) उभी होती. वनविभागाने घेराव घालून झडती घेतली असता, त्यात एक जिवंत जंगली रानडुक्कर आणि शिकारीचे मोठे साहित्य आढळले.

​अटकेतील आरोपी:​या कारवाईत अटक करण्यात आलेले आरोपी अंशु बबलु गौंडाने (२१) - रा. नागपूर, महेश शामराव मेश्राम (२६) - रा. मकरधोकडा, प्रदिप हरिश्चंद्र शेंडे (२३) - रा. अर्जुनी, सचिन देवदास मेश्राम (२९) - रा. पचखेडी, रोहीत नंदेश्वर कुंडले (२५) - रा. झारली, मनिष सुनिल मारबते (२३) - रा. कारधा, रोशन रमेश शेंडे (२५) - रा. अर्जुनी, खेमराज उमराव बोंदरे (२९) - रा. अर्जुनी, योगेश दोडकु शेंडे (२९) - रा. अर्जुनी, राम नंदेश्वर उईके (२३) - रा. भंडारा, मंगेज गुलाब मारबते (२३) - रा. मोहाडी, सतिश कोठीराम शेंडे (२८) - रा. रोहा.

छत्तीसगडपर्यंत पसरले जाळे :

प्राथमिक चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, ते शेतातून आणि जंगलातून रानडुक्कर पकडून त्यांची विक्री थेट नागपूर आणि छत्तीसगड राज्यामध्ये करायचे. शिकारीसाठी त्यांनी १३ हत्तीमार जाळी, कुऱ्हाड, सुरा आणि ४० बांबूच्या काठ्यांचा वापर केला होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर साहित्य घेऊन हे तस्कर फिरत असताना स्थानिक प्रशासनाला याची कुणकुण कशी लागली नाही? हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.

​ ​

आरोपींविरुद्ध भारतीय वन कायदा १९२७ चे कलम २६(१) आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ (सुधारित २०२३) च्या कलम ९, ४८, ४९, ५० आणि ५१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.​तपासाचे चक्र वेगाने : सदर कारवाई उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह आणि विभागीय वन अधिकारी रितेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्राधिकारी तुमसर छगनलाल रहांगडाले, आर.डी. पाल्हेवार आणि के. ए. मांढरे यांनी यशस्वी केली.

Tags:#Wildlife Smuggling#Wild Boar Hunting#Forest Department Action#Nakadongri Forest Range#Tumsar News

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
38
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
90
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
20
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com