India Mornings
India Morning
Global News Portal
Wednesday, February 11, 2026
Loading latest news...
News10 February 202616 views

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

R
Rutuja
Published in General
झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

तुमसर (१० फेब्रुवारी, भंडारा) : झाडावरून पडून कुंपणावर कोसळलेल्या एका कामगाराच्या पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल त्यामुळे पोटातील आतळ्या बाहेर आले आणि तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आणले असता त्याला डॉक्टरांनी या गंभीर जखमी कामगारावर तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.

यासंदर्भात संबंधित ठेकेदाराने सांगितले की, माडगी येथील श्रीनबाई नेत्रावाला सीबीएसई शाळेतील घटना असून मजुरी काम करताना ताराचंद बांते, पालोरा ४५ वर्षीय कामगार झाडावर चढला. तथापि तोल न राखता आल्याने हा मजूर झाडावरून कोसळून खाली असलेल्या कुंपणावर पडला. कुंपणाच्या धारदार लोखंडी टोकदार अँगलवर पडला त्यामुळे अग्रभाग या कामगाराच्या पोटाला चिरून निघाली. सदर उंचावरून हा कामगार पडल्याने लोखंडी अँगल पोटाचा नाजूक भागात लागल्याने त्याच अवस्थेत रक्तबंबाळ होऊन तो जमिनीवर कोसळला. दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी अंदाजे दुपारी २.५० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

सदर कामगाराच्या सहकाऱ्यांनी त्याला तातडीने नजीकचे तुमसर येथील रुग्णालय म्हणून शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या कामगारांच्या रक्तबंबाळ अवस्था आणि गंभीर स्थिती पाहता उपस्थित डॉक्टरांनी तातडीने सदर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र ताराचंद बांते (पालोरा) यांना रक्तस्राव होत असल्याने या कामगाराची प्रकृती गंभीर आहे. तरी श्रीनबाई सीबीएसई शाळेच्या निष्काळजीपणामुळे ही मोठी घटना घडली असून एस एन एस शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जर शाळेच्या आवारात इतकी मोठी घटना घडली आहे तर यामध्ये विद्यार्थी कसे काय सुरक्षित राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या मजुराला उपचारासाठी दुपारच्या तीन वाजेच्या दरम्यान दाखल केल्यानंतर त्याच्या अपघाताची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तातडीने देणे गरजेचे असताना सुध्दा संबंधित डॉक्टरांनी याकडे दुर्लक्ष केले असून त्याची माहिती रात्री सात वाजेपर्यंत देण्यात आली. त्यामुळे रुग्णालय या प्रकरणात गंभीर नसून हलगर्जीपणा दिसून येते.

Tags:##तुमसर बातमी#भंडारा न्यूज#कामगार अपघात#झाडावरून पडला#लोखंडी अँगल

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
36
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
68
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
53
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com