India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, March 7, 2026
Loading latest news...
News7 March 20265 views

पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भीषण हिंसाचार; शिया समुदायावर गोळीबारात ३८ जणांचा मृत्यू

P
Puja Nitnaware
Published in General
पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भीषण हिंसाचार; शिया समुदायावर गोळीबारात ३८ जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात शिया समुदायावरील गोळीबाराच्या घटनेने परिस्थिती गंभीर झाली आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या ताब्यातील गिलगिट-बाल्टिस्तान प्रदेशात शिया समुदायावरील गोळीबाराच्या घटनेने परिस्थिती गंभीर झाली आहे. या गोळीबारात किमान ३८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी गिलगिट-बाल्टिस्तानमधील प्रमुख शहर स्कार्दू येथे मोठ्या प्रमाणावर निदर्शने सुरू झाली होती. या आंदोलनात बाल्टी शिया समाजातील हजारो लोक सहभागी झाले होते. सुरुवातीला हे आंदोलन शांततेत सुरू होते; मात्र सुरक्षा दलांच्या कारवाईनंतर परिस्थिती अचानक बिघडली.

निदर्शकांना पांगवण्यासाठी लष्कर आणि निमलष्करी दलांकडून गोळीबार करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या गोळीबारात बाल्टी शिया समाजातील अनेक जण जखमी झाले, तर किमान ३८ जणांचा मृत्यू झाला. सुरुवातीला मृतांची संख्या कमी असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र जखमींपैकी अनेक जण उपचारादरम्यान दगावल्याने मृतांचा आकडा वाढला.

ही बातमी पसरताच संपूर्ण प्रदेशात संतापाची लाट उसळली. संतप्त जमावाने अनेक ठिकाणी सरकारी इमारती आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करत तोडफोड व जाळपोळ केली. त्यामुळे स्कार्दू आणि आसपासच्या भागात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काही भागांमध्ये संचारबंदी लागू केली असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या घटनेमुळे गिलगिट-बाल्टिस्तानमधील दीर्घकाळापासूनचा असंतोष आणि राजकीय तणाव पुन्हा एकदा उघड झाला आहे.

Tags:#Violent violence#Pakistan#38 killed#Shia community

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
46
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
109
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
26
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
पाकिस्तानमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये भीषण हिंसाचार; शिया समुदायावर गोळीबारात ३८ जणांचा मृत्यू - India Morning