India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, April 20, 2026
Loading latest news...
News6 March 202619 views

UPSC नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

R
Rutuja
Published in General
UPSC नागरी सेवा परीक्षा २०२५ चा अंतिम निकाल जाहीर; अनुज अग्निहोत्री देशात अव्वल

UPSC नागरी सेवा परीक्षा 2025 चा अंतिम निकाल जाहीर. अनुज अग्निहोत्री देशात प्रथम, राजेश्वरी सुवे एम दुसऱ्या तर आकांश धुल तिसऱ्या स्थानावर.

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२५ चा अंतिम निकाल आज (६ मार्च) जाहीर केला. या प्रतिष्ठित परीक्षेत अनुज अग्निहोत्री यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावत यंदाच्या निकालात बाजी मारली आहे. त्यांच्या पाठोपाठ राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरे, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान मिळवले आहे.

यावर्षीच्या टॉप-१० यादीत राघव झुनझुनवाला, ईशान भटनागर, झीनिया अरोरा, ए.आर. राजा मोहद्दीन, पक्षल सेक्रेटरी, आस्था जैन आणि उज्ज्वल प्रियंक यांचाही समावेश झाला आहे.

UPSC ने दिलेल्या माहितीनुसार, यंदा एकूण ९५८ उमेदवार नागरी सेवा परीक्षेत यशस्वी ठरले असून विविध केंद्रीय सेवांसाठी त्यांच्या नियुक्तीची शिफारस करण्यात आली आहे. यापैकी ३४८ उमेदवारांची उमेदवारी तात्पुरत्या स्वरूपात स्वीकारण्यात आली आहे.

तीन टप्प्यांत पार पडली परीक्षा-

नागरी सेवा परीक्षेची प्राथमिक परीक्षा २५ मे २०२५ रोजी घेण्यात आली होती. त्यानंतर मुख्य परीक्षा २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान झाली. अंतिम टप्प्यातील व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) प्रक्रिया ५ जानेवारी ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडली.

मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या २,७३६ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. सर्व मुलाखती पूर्ण झाल्यानंतर आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला. निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण UPSC च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

विविध सेवांसाठी उमेदवारांची निवड-

आयोगाच्या माहितीनुसार, यंदा ९५८ पदांसाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये –

१८० उमेदवार – भारतीय प्रशासकीय सेवा (IAS)

५५ उमेदवार – भारतीय परराष्ट्र सेवा (IFS)

१५० उमेदवार – भारतीय पोलिस सेवा (IPS)

याशिवाय इतर केंद्रीय सेवांसाठीही उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

IAS पदांसाठी आरक्षणाचे वितरण-

१८० आयएएस पदांपैकी –

७४ पदे अनारक्षित

२८ पदे अनुसूचित जाती

१३ पदे अनुसूचित जमाती

४७ पदे ओबीसी

१८ पदे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)

दरवर्षी UPSC मार्फत नागरी सेवा परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांत घेतली जाते. या प्रक्रियेतून IAS, IPS, IFS यांसह विविध केंद्रीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाते.

Tags:#UPSC CSE 2025 Result#UPSC Final Result 2025#UPSC Topper 2025#Civil Services Exam Result#Anuj Agnihotri UPSC Topper

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
64
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
136
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
28
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com