India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News28 February 202624 views

उद्धव ठाकरे यांना धक्का; डोंबिवलीत ठाकरे गटाचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

P
Puja Nitnaware
Published in General
उद्धव ठाकरे यांना धक्का; डोंबिवलीत ठाकरे गटाचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणांना वेग आला असून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

डोंबिवली : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर राजकीय समीकरणांना वेग आला असून ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. डोंबिवली येथे शिवसेना ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची माहिती समोर आली आहे.

नगर परिषद, नगर पंचायती, महापालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजपने आघाडी घेतली, तर शिवसेना शिंदे गटानेही लक्षणीय यश मिळवले. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांमध्ये पक्षांतराचे सत्र सुरूच आहे. त्याचा फटका ठाकरे गटालाही बसत असल्याचे चित्र आहे.

डोंबिवलीत खासदार Shrikant Shinde आणि आमदार राजेश मोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. ठाकरे गटाचे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख आणि अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. त्यामुळे डोंबिवलीतील संघटनात्मक ताकदीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदे गटात तसेच भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. सततच्या या पक्षांतरामुळे ठाकरे गटासमोर संघटना टिकवण्याचे आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

डोंबिवलीतील या ताज्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे गटाची रणनीती काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:#Uddhav Thackeray#Thackeray Group#Eknath Shinde#Shiv Sena#Mumbai news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
97
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com