India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News19 February 202615 views

शिवजयंतीचा जल्लोष; शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय सोहळा

P
Puja Nitnaware
Published in General
शिवजयंतीचा जल्लोष; शिवनेरीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शासकीय सोहळा

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साह, अभिमान आणि भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले.

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साह, अभिमान आणि भक्तीभावाचे वातावरण निर्माण झाले. पहाटेपासूनच गड-किल्ले, मंदिर परिसर आणि शहरांमध्ये ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने आसमंत दुमदुमला.

शिवजन्मभूमी शिवनेरी किल्ला येथे शासकीय स्तरावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा जोजावत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या निनादात हजारो शिवभक्तांनी गडावर हजेरी लावून अभिवादन केले.

गडावरील शिवाई देवी टेम्पल येथे शिवाई देवी व शिवरायांचा विधीवत अभिषेक पार पडला. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शिस्तबद्ध आणि भावपूर्ण वातावरणात सोहळा पार पडल्याने उपस्थितांना ऐतिहासिक क्षण अनुभवता आला.

कल्याण येथे ४२२ किल्ल्यांची नावे एकत्रित करून शिवछत्रपतींचे आकर्षक चित्र साकारण्यात आले. संशोधक-कलावंत डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी अवघ्या दोन दिवसांत ही वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती उभी केली. या उपक्रमाने शिवप्रेमींचे लक्ष वेधले.

धाराशिव येथील तुळजा भवानी टेम्पल येथेही शिवजयंतीनिमित्त विशेष पूजा व अभिषेकाचे आयोजन करण्यात आले. तुळजाभवानी ही शिवरायांची कुलदैवत मानली जात असल्याने या धार्मिक विधींना विशेष महत्त्व लाभले. मंदिर परिसरात भक्तांनी प्रदक्षिणा घालत जयघोष केला.

दरम्यान, सोलापुरातील मराठा वस्तीत सलग सातव्या वर्षी डीजेमुक्त शिवजयंती साजरी करत सामाजिक भान जपले गेले. डीजेवरील खर्च वाचवून महिलांना साडी-चोळी भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. तसेच चित्रकार नितीन खिलारे यांनी शिवरायांच्या विजय क्षणाचे भव्य चित्र रंगवून कलात्मक आदरांजली अर्पण केली.

राज्याच्या कानाकोपऱ्यात शिवजयंतीचा जल्लोष सुरू असतानाच शिवरायांच्या पराक्रमाची, स्वराज्याच्या संकल्पनेची आणि आदर्श नेतृत्वाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Tags:#Maharashtra leaders#Shivneri Fort#chhatrapati shivaji maharaj#CM Eknath Shinde#Sunetra Pawar

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
97
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com