India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, February 5, 2026
Loading latest news...
News4 February 20261 views

शरद पवार बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी सहयोग सोसायटीत दाखल

R
Rutuja
Published in General
शरद पवार बारामतीत उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी सहयोग सोसायटीत दाखल

बारामतीतील सहयोग सोसायटीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी शरद पवार दाखल झाले असून राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील सध्याच्या महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये आज एक खास क्षण घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेट देण्यासाठी बारामती येथील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी भेटीला हजर राहिले.

या भेटीपूर्वी पवार कुटुंबीयांतील आमदार रोहित पवार आणि इतर सदस्य देखील सोसायटीत दाखल झाले होते. शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि रोहित पवार यांच्यासह आज सुनेत्रा पवार यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली.सहयोग सोसायटीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मोठ्या प्रमाणात लावण्यात आला असून, शरद पवार यांनी प्रथम त्यांच्या प्रतिमेला आदरांजली वाहिली. नंतर ते बैठकीसाठी बसले तर त्यांच्याजवळ सुनेत्रा पवार आणि जय पवार उपस्थित होते.

अजित पवार यांच्या निधनानंतर आज आठ दिवस पूर्ण झाले असून, या दुःखद घटनेमुळे महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्यांच्याकडे मोठ्या जबाबदाऱ्या येत आहेत.शपथ घेतल्यानंतर आज पहिल्यांदाच शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांची भेट झाली असून, या भेटीत कोणते विषय चर्चिले गेले याकडे सत्ताधारी पक्ष आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी पार्थ पवार आणि जय पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.

Tags:#Sharad Pawar#Sunetra Pawar##Baramati#Maharashtra Politics##NCP News

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
28
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
50
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
52
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com