India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News23 February 20266 views

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिलासा देणारी बातमी; पुढील ४८ तासांत डिस्चार्जची शक्यता

R
Rutuja
Published in General
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिलासा देणारी बातमी; पुढील ४८ तासांत डिस्चार्जची शक्यता

शरद पवार यांची प्रकृती स्थिर असून पुढील ४८ तासांत डिस्चार्जची शक्यता. रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती.

पुणे : शरद पवार यांना प्रकृती अस्वस्थ झाल्याने पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या आरोग्याबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची तब्येत सध्या स्थिर असून पुढील ४८ तासांत त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू-

पवार यांच्यावर रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू आहेत. उलट्यांचा त्रास झाल्याने शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) निर्माण झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. आवश्यक उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व तपासण्यांचे अहवाल समाधानकारक आले आहेत. रक्ततपासणी, सिटीस्कॅनसह इतर आवश्यक वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून कोणतीही गंभीर बाब आढळलेली नाही. सध्या ते नियमित आहार घेत असून विश्रांती घेत आहेत.

काही दिवस पुण्यातच विश्रांती-

वैद्यकीय सल्ल्यानुसार, डिस्चार्जनंतरही काही दिवस ते पुण्यातच विश्रांती घेणार असून त्यानंतर मुंबईकडे रवाना होण्याची शक्यता आहे. डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे.याआधीही छातीत कफ झाल्याने त्यांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणण्यात आले होते. त्यावेळी पाच दिवस उपचारानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले होते.

दरम्यान, पवार यांच्या प्रकृतीबाबत कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत असली तरी सध्याची स्थिती स्थिर असून काळजीचे कारण नसल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Tags:#Sharad Pawar#Health Update#Pune news#Ruby Hall Clinic##NCP News

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
97
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
59
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com