India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 5, 2026
Loading latest news...
News9 February 202637 views

शरद पवार यांची प्रकृती खालावली; पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवणार

P
Puja Nitnaware
Published in General
शरद पवार यांची प्रकृती खालावली; पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील उपचारांसाठी त्यांना पुण्यातील रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत पूर्णपणे ठणठणीत नसल्याचे सांगितले जात होते; मात्र आज सकाळपासून त्रास वाढल्याने डॉक्टरांनी सखोल तपासणीचा सल्ला दिला.

सध्या शरद पवार हे बारामतीतील गोविंदबाग येथील निवासस्थानी आहेत. आज सकाळी त्यांना ताप, खोकला व कफचा त्रास जाणवल्याने डॉक्टरांचे पथक त्यांच्या घरी दाखल झाले. प्राथमिक तपासणीनंतर औषधोपचार सुरू करण्यात आले. दुपारच्या सुमारास डॉक्टरांच्या दुसऱ्या पथकानेही पुन्हा तपासणी केली.

या तपासणीनंतर अधिक काळजी घेण्याच्या दृष्टीने शरद पवार यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या प्रकृतीवर वैद्यकीय पथक बारकाईने लक्ष ठेवून असून, आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात असल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, आज बारामतीतील काठेवाडी येथे होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तेराव्याच्या विधीस शरद पवार उपस्थित राहणार होते. मात्र तब्येत खालावल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार त्यांनी या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी उपचार सुरू असून, पुण्यात दाखल केल्यानंतर आवश्यक त्या सर्व तपासण्या करण्यात येणार आहेत. त्यांच्या तब्येतीबाबतची पुढील माहिती अधिकृतपणे देण्यात येईल, असेही कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:#Sharad Pawar#Health deteriorates#Pune news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
97
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
शरद पवार यांची प्रकृती खालावली; पुढील उपचारांसाठी पुण्याला हलवणार - India Morning