India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, March 14, 2026
Loading latest news...
News2 February 202610 views

गोव्यातील QS इंडिया समिट २०२६ मध्ये India@2047 शिक्षण दृष्टिकोनावर भर

P
Puja Nitnaware
Published in General
गोव्यातील QS इंडिया समिट २०२६ मध्ये India@2047 शिक्षण दृष्टिकोनावर भर

“विकसित भारत @2047 साकारण्यासाठी सक्षम मानवी भांडवल आणि भविष्यकालीन संस्थांचा कणा अत्यंत महत्त्वाचा आहे,” — मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी: शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या आश्रयाखाली गोव्यातील डोना पावला येथे QS इंडिया समिट २०२६ आयोजित करण्यात आला आहे. १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या तीन दिवसीय परिषदेकरिता धोरणकर्ते, शैक्षणिक नेते तसेच जागतिक शिक्षणतज्ज्ञ एकत्र आले असून, उच्च शिक्षणाच्या भविष्यावर आणि जागतिक ज्ञानकेंद्र म्हणून भारताच्या उदयावर सखोल चर्चा केली जात आहे.

जागतिक तसेच भारतीय उच्च शिक्षणासाठी निर्णायक टप्प्यावर आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेचा विषय “India@2047: कौशल्यनिर्मिती, विस्तार आणि नवोन्मेषाला चालना” असा आहे. जगभरातील शिक्षण प्रणालींमध्ये मूलभूत बदल घडत असताना, मानवी भांडवल बळकट करणे, भविष्यकालीन दृष्टीकोन असलेल्या संस्था उभारणे तसेच शिक्षणाला नवोन्मेष, रोजगारक्षमतेशी आणि सामाजिक परिवर्तनाशी संलग्न करणे, या माध्यमातून दीर्घकालीन राष्ट्रीय विकासाला पाठबळ देण्यावर परिषदेत विशेष भर देण्यात आला आहे.

परिषदेला संबोधित करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, विकसित भारत @2047 या ध्येयपूर्तीसाठी शिक्षण हा केंद्रबिंदू आहे. सशक्त मानवी भांडवल आणि भविष्यकालीन संस्थांवरच २०४७ पर्यंत भारत विकसित राष्ट्र म्हणून यशस्वी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली हे उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग्स २०२६ मध्ये ५४ भारतीय विद्यापीठांचा समावेश होणे हे उच्च शिक्षणातील सातत्यपूर्ण सुधारणा, शैक्षणिक उत्कृष्टता आणि लक्ष केंद्रीत धोरणात्मक हस्तक्षेपांचे प्रतिबिंब असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. भारताची जागतिक शैक्षणिक ओळख अधिक भक्कम करण्यासाठी QS आणि डॉ. अश्विन फर्नांडिस यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

राष्ट्रीय शिक्षण प्रवासात गोव्याची भूमिका अधोरेखित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) अनुरूप सुधारणा, डिजिटल परिवर्तन, संशोधन व नवोन्मेष उपक्रम तसेच उद्योगांशी सशक्त भागीदारी यांच्या माध्यमातून गोवा राज्य मजबूत आणि सर्वसमावेशक उच्च शिक्षण परिसंस्था उभारण्यासाठी कटिबद्ध आहे. मनोहर पर्रीकर गोवा स्कॉलर्स योजना, गोवा विद्यापीठ संशोधन उद्यान (रिसर्च पार्क) युनिट तसेच PM-USHA अंतर्गत पायाभूत सुविधांचा विकास अशा विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांचा उल्लेख करत त्यांनी गुणवत्ता, उपलब्धता आणि जागतिक सहभाग वाढवण्यावर भर दिला.

या परिषदेला QS इंडिया चे कार्यकारी संचालक डॉ. अश्विन फर्नांडिस, भारतातील कॅनडाचे आयुक्त श्री. ख्रिस्तोफर कुटर, शिक्षण मंत्रालय, भारत सरकारचे वरिष्ठ अधिकारी, विविध विद्यापीठांचे कुलगुरू व प्रतिनिधी तसेच अन्य मान्यवर आणि प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags:##Education vision

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
52
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
114
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
30
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com