India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, March 13, 2026
Loading latest news...
News13 March 20266 views

खापरखेडा रोडवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघांना अटक

P
Puja Nitnaware
Published in General
खापरखेडा रोडवरील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; चौघांना अटक

रोख रक्कम व मोबाईल जप्त

नागपूर : खापरखेडा रोड परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत चौघांना अटक केली आहे. पत्त्यांच्या साहाय्याने पैशांची बाजी लावून जुगार खेळत असताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई १२ मार्च रोजी रात्री सुमारे ८.२५ ते ९.३० वाजताच्या दरम्यान जुने कामठी पोलिस स्टेशन च्या हद्दीत खापरखेडा रोडवरील एका रुग्णालयाजवळील मोकळ्या जागेत करण्यात आली. पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकून जुगार सुरू असताना आरोपींना ताब्यात घेतले.

या कारवाईत पोलिसांनी योगेश दिनेश भांडारकर (३९, मसूरकर चौक, गंगा-जमुना), गोपाल उर्फ गोलू गौरीशंकर वर्मा (३६, सोनार ओली, कामठी), प्रशांत केशकुमार वर्मा (४२, कांड्री, कान्हान) आणि कैलास किसनराव डोंगरे (४७, विठ्ठाभट्टी चौक) या चार जणांना अटक केली.

छाप्यात आरोपींकडून ३८,०४० रुपयांची रोख रक्कम, तीन मोबाईल फोन, पत्त्यांचा संच तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६१,४४० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी आरोपींविरुद्ध Maharashtra Prevention of Gambling Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. परिसरात बेकायदेशीर जुगाराच्या अड्ड्यांवर पोलिसांकडून अशाच प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Tags:#Four arrested#Police Raid#Gambling den#Khaparkheda#Nagpur news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
52
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
114
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
30
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com