India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 5, 2026
Loading latest news...
News17 February 20266 views

मनपाचे भूखंड फ्री होल्ड करण्यासाठी दटकेंचा पाठपुरावा

R
Rutuja
Published in General
मनपाचे भूखंड फ्री होल्ड करण्यासाठी दटकेंचा पाठपुरावा

नागपूर मनपाच्या भाडेपट्ट्यावरील भूखंडांना फ्री होल्ड देण्याबाबत बैठक; कॅबिनेटसमोर प्रस्ताव मांडण्याचा निर्णय.

मंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेत बैठकीत मिळाली गती

नागपूर येथे हिवाळी अधिवेशना दरम्यान प्रवीण दटके यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी नागपूर महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेच्या मालकीच्या अभिन्यासातील भाडे पट्यावर देण्यात आलेले भूखंड मालकी हक्काने देणेबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या लक्षेवधी दरम्यान नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याने शंभूराज देसाई यांनी बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे झालेल्या बैठकीत कॅबिनेट समोर विषय मांडण्याचा निर्णय घेण्यात आला.

*दरम्यान प्रवीण दटके यांनी बैठकीत सविस्तर मांडणी केली. महापालिकेच्या ताब्यात एकूण 22 अभिन्यास असून 7 अभिन्यास हे 30-40 वर्षांपूर्वीचे तर 15 अभिन्यास हे नागपूर महानगरपालिका अस्तित्वात येण्यापूर्वी म्हणजे 90 वर्षांपूर्वीपासून भाडेपट्याने दिले आहेत. भुखंड मागणीनुसार देण्यात आले असून काही भूखंड हे निवासी वापरासाठी देण्यात आले आहेत. भुखंड देताना नागरिकांकडून प्रीमियम घेण्यात आले असून बाजारभावाच्या किंमतीत रक्कम आकारण्यात आल्याची माहिती दटके यांनी दिली. महसूल विभागाने नझूल जमिनी फ्री होल्ड करण्याबाबत जे धोरण वापरले त्याच धोरणाचा विचार करण्याची सूचना दटके यांनी केली.*

यावेळी, राज्यातील इतर जिल्हात फ्री होल्डसाठी केलेल्या कार्यवाहीचा अभ्यास करून तसेच नागपूर आणि अमरावती विभागात अंमलात आणलेल्या नझूल धोरणाची देखील माहिती घेऊन नगर विकास मंत्र्यांसमोर प्रस्ताव ठेवण्याच्या सूचना शंभूराज देसाई यांनी दिल्या. तसेच हा धोरणात्मक निर्णय असल्याने कॅबिनेट बैठकीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या.

यावेळी मंत्री शंभूराज देसाई, आ. प्रवीण दटके, सहसचिव विद्या हम्पय्या, पालिका आयुक्त अभिजित चौधरी आदि अधिकारी उपस्थित होते.

Tags:#Nagpur Municipal Corporation#Pravin Datke#Shambhuraj Desai#Eknath Shinde#Nagpur news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
97
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
मनपाचे भूखंड फ्री होल्ड करण्यासाठी दटकेंचा पाठपुरावा - India Morning