India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 19, 2026
Loading latest news...
News19 March 202613 views

दुबई टूरच्या नावाखाली ऑनलाईन गंडा; नागपूरातील नागरिकाला १.६८ लाखांचा फटका

R
Rutuja
Published in General
दुबई टूरच्या नावाखाली ऑनलाईन गंडा; नागपूरातील नागरिकाला १.६८ लाखांचा फटका

नागपुरात दुबई टूरच्या आमिषाने 1.68 लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून तपास सुरू।

नागपूर : सोशल मीडियावर दिसलेल्या आकर्षक दुबई टूर पॅकेजच्या जाळ्यात अडकून शहरातील एका व्यक्तीची १ लाख ६८ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे.

प्रभात सालवे असे पीडित व्यक्तीचे नाव असून, ते जानेवारी २०२५ मध्ये कुटुंबासह दुबई सहलीचे नियोजन करत होते. याच काळात त्यांना Facebook वर ‘नो कॉस्ट ईएमआय’वर दुबई टूर देण्याची जाहिरात दिसली. ही ऑफर ‘PAQ ट्रिप अँड टूर्स’ या नावाने देण्यात आली होती.

जाहिरातीवर विश्वास ठेवून सालवे यांनी संपर्क साधला असता खुदी सॅक्सेना, लक्ष्य अरोरा आणि अमीन अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी आकर्षक पॅकेजची माहिती देत विश्वास संपादन करण्यासाठी बनावट व्हिसा कागदपत्रे आणि IndiGo एअरलाईन्सकडून आल्याचा भास होईल असा खोटा ईमेल पाठवला.

या सर्व कागदपत्रांवर विश्वास ठेवत सालवे यांनी दिलेल्या बँक खात्यात १.६८ लाख रुपये जमा केले. मात्र, प्रवासाची वेळ जवळ येताच संबंधितांकडून टाळाटाळ सुरू झाली. शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी फसवणूक आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा माग काढण्यासाठी तपास सुरू आहे.

Tags:#Nagpur cyber fraud#Dubai tour scam#online travel fraud India#Facebook scam India#cyber crime Nagpur

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
55
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
118
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
68
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com