India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News23 February 202634 views

नागपुरात अँटी नार्कोटिक्स पथकाची धडाकेबाज कारवाई; ५०५ किलो गांजा हस्तगत

R
Rutuja
Published in General
नागपुरात अँटी नार्कोटिक्स पथकाची धडाकेबाज कारवाई; ५०५ किलो गांजा हस्तगत

मौदा तालुक्यातील माथनी टोल प्लाझा येथे अँटी नार्कोटिक्स पथकाने ५०५ किलो गांजा जप्त केला; ओडिशा लिंक उघड.

राज्याबाहेरील तस्करी साखळी उघड

नागपूर : अमली पदार्थांविरोधातील मोहिमेला गती देत नागपूर पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. मौदा तालुक्यातील माथनी टोल प्लाझा परिसरात सापळा रचून एका ट्रकमधून तब्बल ५०५ किलो गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले असून ही खेप ओडिशातून गुप्तपणे नागपुरात आणली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.

विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर विशेष पथकाने सोमवारी पहाटेच मौदा परिसरात नजर ठेवली. तांत्रिक विश्लेषण आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे संशयित वाहनाचा माग काढण्यात आला. माथनी टोल नाक्यावर ट्रक अडवून झडती घेतली असता, मालवाहू वाहनात लपवून ठेवलेला मोठ्या प्रमाणातील गांजा आढळून आला.दरम्यान, यापूर्वी झिंगाबाई टाकळी परिसरात छापा टाकून पोलिसांनी अब्दुल वहीद उर्फ ‘खोका’ या कुख्यात तस्कराला अटक केली होती. तो आपल्या सासरच्या घरातूनच अमली पदार्थांचा व्यवहार चालवत असल्याचे उघडकीस आले. त्या कारवाईत सुमारे ७५ किलो गांजा जप्त करण्यात आला होता.

अटकेतील आरोपीच्या मोबाईलमधील तपासात ओडिशातील एका संशयित संपर्काचा तपशील समोर आला. संबंधित ट्रक नागपूरकडे येत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी टोल नाक्यावर जाळे टाकत ही मोठी कारवाई यशस्वी केली.सध्या ट्रकचालकाची कसून चौकशी सुरू असून या आंतरराज्यीय गांजा तस्करी साखळीतील इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

Tags:#Nagpur Police#Anti Narcotics Task Force#Ganja Seizure##Drug Trafficking#Mauda

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
99
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
नागपुरात अँटी नार्कोटिक्स पथकाची धडाकेबाज कारवाई; ५०५ किलो गांजा हस्तगत - India Morning