India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 12, 2026
Loading latest news...
News12 March 20269 views

महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या ‘मोनालिसा’चा मुस्लिम प्रियकरासोबत प्रेमविवाह; केरळमध्ये केला विवाह

P
Puja Nitnaware
Published in General
महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या ‘मोनालिसा’चा मुस्लिम प्रियकरासोबत प्रेमविवाह; केरळमध्ये केला विवाह

प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात आपल्या सुंदर डोळ्यांमुळे आणि साधेपणामुळे देशभरात चर्चेत आलेली मोनालिसा भोसले हिने अखेर प्रेमविवाह केला आहे.

केरळ : प्रयागराज येथे भरलेल्या महाकुंभ मेळ्यात आपल्या सुंदर डोळ्यांमुळे आणि साधेपणामुळे देशभरात चर्चेत आलेली मोनालिसा भोसले हिने अखेर प्रेमविवाह केला आहे. ११ मार्च २०२६ रोजी केरळमधील तिरुवनंतपुरम येथे तिने तिचा प्रियकर फरमान खान याच्यासोबत लग्न केले.

मोनालिसाच्या कुटुंबीयांकडून या आंतरधर्मीय विवाहाला विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः तिचे वडील जय भोसले या नात्याच्या विरोधात होते. मात्र मोनालिसाने आपल्या प्रियकरासोबतच विवाह करण्याचा निर्णय कायम ठेवला. मध्य प्रदेशात लग्नाला विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन या जोडप्याने केरळची निवड केली.

लग्नाच्या आधी दोघांनी तिरुवनंतपुरममधील तम्पानूर पोलिस ठाण्यात जाऊन संरक्षणाची मागणी केली होती. त्यानंतर एका मंदिरात दोघांनी एकमेकांना वरमाला घालत विवाहाची विधी पूर्ण केली. संभाव्य विरोध टाळण्यासाठी विवाहस्थळी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. या विवाहावेळी केरळमधील काही राजकीय नेतेही उपस्थित होते.

मोनालिसा ही मध्य प्रदेशातील इंदूरजवळील मंडलेश्वर येथील रहिवासी आहे. प्रयागराजमध्ये झालेल्या महाकुंभ मेळ्यात ती माळा आणि धार्मिक वस्तू विकत होती. याच काळात तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिच्या डोळ्यांमुळे ती रातोरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर तिला चित्रपटात काम करण्याचीही संधी मिळाली.

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी ‘द डायरी ऑफ मणिपुर’ या चित्रपटासाठी मोनालिसाला साइन केले होते. चित्रपटासाठी तिला वाचन-लेखनाचे प्रशिक्षणही दिले जात होते. तसेच तिला साइनिंग अमाऊंट देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. अलीकडेच तिचे एक व्हिडिओ गाणेदेखील प्रदर्शित झाले होते.

दरम्यान, अचानक झालेल्या या विवाहानंतर तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगवर काय परिणाम होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तिरुवनंतपुरममध्ये माध्यमांशी बोलताना मोनालिसाने सांगितले की, “आम्ही गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांच्या प्रेमात आहोत.” तर फरमान खानने काही माध्यमांमध्ये मोनालिसा अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळत ती १८ वर्षांपेक्षा मोठी असल्याचे स्पष्ट केले.

Tags:#Mahakumbh#Mona Lisa#Muslim lover#Marriage#Kerala News

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
50
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
113
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
30
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
महाकुंभात प्रसिद्ध झालेल्या ‘मोनालिसा’चा मुस्लिम प्रियकरासोबत प्रेमविवाह; केरळमध्ये केला विवाह - India Morning