India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, March 7, 2026
Loading latest news...
News7 March 20263 views

नाशिकमध्ये पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; सुरगाणा तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

P
Puja Nitnaware
Published in General
नाशिकमध्ये पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; सुरगाणा तालुक्यात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सुरगाणा तालुक्यात आज पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंपीय हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आज पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले. या धक्क्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भूकंपीय हालचालींमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास हे धक्के जाणवले. अंबरनाथ , निवारपाडा , चुली, राशा, गोंडाळविहीर आणि अलंगुण या गावांमध्ये भूकंपाचे धक्के अधिक जाणवले.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून या भागात अशा प्रकारचे सौम्य धक्के वारंवार जाणवत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे अनेकांनी खबरदारी म्हणून रात्री घराबाहेर मोकळ्या जागेत किंवा शेतात मुक्काम करण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, महसूल प्रशासन आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी केली असून नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कच्च्या किंवा मोडकळीस आलेल्या घरांमध्ये न राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उंबरठाण परिसर हा या भूकंपाच्या हालचालींचे केंद्रबिंदू असू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे येथे तातडीने भूकंपमापन यंत्र बसवावे, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Tags:#Earthquake#Nashik News#Maharashtra news#Surgana taluka

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर; काय स्वस्त काय महाग जाणून घ्या?

राज्याचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (६ मार्च) २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीचा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला.

Mar 6, 2026
12
Read More →

CM Fadnavis: Maharashtra stands with Growth, Mahayuti wins big

Maharashtra CM Devendra Fadnavis said the BJP-led Mahayuti won big in the municipal elections because people trusted its work and vision for progress.

Jan 16, 2026
6
Read More →

त्र्यंबकेश्वर मंदिर पहुंचे शिवराज सिंह चौहान, किसानों की समृद्धि की कामना

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान ने नासिक के त्र्यंबकेश्वर मंदिर में पूजा कर किसानों की समृद्धि और देश की प्रगति की कामना की।

Jan 2, 2026
15
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com