India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News13 January 202629 views

महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल; स्वेटरसोबत छत्रीही बाळगा!

R
Rutuja
Published in General
महाराष्ट्रात हवामानात मोठा बदल; स्वेटरसोबत छत्रीही बाळगा!

महाराष्ट्रात थंडीच्या दिवसांत पावसाची शक्यता; पश्चिम महाराष्ट्रात सरी, विदर्भात कडाक्याची थंडी, यलो अलर्ट जारी.

मुंबई - महाराष्ट्रात ऐन थंडीच्या काळात अचानक हवामानाने नवा रंग घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे, सोलापूरमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणातील भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणवत असून, थंडीच्या दिवसांत पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.सोमवारी (12 जानेवारी) पावसाने राज्यातील हवामान चटका लावला असून, मंगळवार (13 जानेवारी) देखील राज्यभर हवामानात सतत बदल होत राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण कायम राहून काही भागांत हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे.

मराठवाडा आणि विदर्भात मात्र थंडीचा जोर अधिक असल्याने किमान तापमान 8 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. या भागांमध्ये पहाटे दाट धुके, थंड वारे व हुडहुडी वाढवणारी थंडी जाणवेल. नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया येथे कडाक्याची थंडी राहणार आहे.बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या हवामान प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाची स्थिती तयार झाली असून त्याचा महाराष्ट्रावर अप्रत्यक्ष परिणाम होत आहे. त्यामुळे थंडीच्या काळातही काही भागांमध्ये पावसाची सरी पडत आहेत.

कोकणात सकाळ-रात्र थंडी जाणवेल, पण दुपारी तापमान वाढल्याने उकाडा जाणवण्याची शक्यता आहे. येथे कमाल तापमान 30-32 अंश आणि किमान 18-22 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.हवामान विभागाने नागरिकांना सकाळ आणि रात्री विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. थंडी व पावसामुळे हवामानात बदल होत असल्याने आवश्यक ते कपडे तसेच छत्री सोबत ठेवण्याचा इशारा दिला आहे.

अशा परिस्थितीत स्वेटरसोबत छत्रीही बाळगणे गरजेचे झाले आहे, जेणेकरून थंडी आणि पावसापासून संरक्षण करता येईल. पुढील काही दिवस महाराष्ट्रात अशीच हवामान परिस्थिती राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.नागरिकांनी हवामान विभागाच्या सुचनांकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

Tags:##Winter Rain##Marathwada Weather#winter#Winter Health#Winter Update

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
42
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
96
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
59
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com