India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 12, 2026
Loading latest news...
News12 March 202612 views

गॅस तुटवड्याने नागपूरकर हैराण; छोटा ताजबागमध्ये सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

P
Puja Nitnaware
Published in General
गॅस तुटवड्याने नागपूरकर हैराण; छोटा ताजबागमध्ये सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा

छोटा ताजबाग परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे.

नागपूर : शहरातील छोटा ताजबाग परिसरात घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचे चित्र समोर आले आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना पहाटेपासूनच रांगेत उभे राहावे लागत असून, अनेकांना तासन्तास प्रतीक्षा करूनही सिलेंडर मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. या परिस्थितीचा परिणाम स्थानिक गॅस पुरवठ्यावर झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून, अनेक ठिकाणी सिलेंडरचा तुटवडा जाणवत आहे.

दरम्यान, केवळ घरगुती गॅसच नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळण्यातही अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे छोट्या हॉटेल्स, टपऱ्या आणि खानावळी चालवणाऱ्या व्यावसायिकांनाही मोठा फटका बसत आहे. गॅस उपलब्ध नसल्यामुळे काही व्यावसायिकांना आपले व्यवसाय तात्पुरते बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

या पार्श्वभूमीवर गॅस वितरकांकडून पुरेसा पुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती सुरळीत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नागरिकांना मूलभूत सुविधेसाठी रांगा लावाव्या लागत असल्याने प्रशासनाच्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Tags:#Nagpur news#Vidarbha news#Long queues#Maharashtra news#LPG cylinders

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
50
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
113
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
30
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
गॅस तुटवड्याने नागपूरकर हैराण; छोटा ताजबागमध्ये सिलेंडरसाठी लांबच लांब रांगा - India Morning