India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, February 5, 2026
Loading latest news...
News5 February 20264 views

भारत जागतिक आशेचा केंद्रबिंदू; तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास – पंतप्रधान मोदी

P
Puja Nitnaware
Published in General
भारत जागतिक आशेचा केंद्रबिंदू; तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचा आत्मविश्वास – पंतप्रधान मोदी

राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासदृष्टीकोनावर सविस्तर भाष्य केले

नवी दिल्ली: राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासदृष्टीकोनावर सविस्तर भाष्य केले. राष्ट्रपतींच्या अभिभाषणातून भारताच्या प्रगतीचा ठाम संदेश संसदेत उमटल्याचे त्यांनी नमूद केले.

२१व्या शतकाचा पहिला टप्पा पूर्ण होत असून, पुढील टप्पा ‘विकसित भारत’ साकारण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. आज भारत केवळ स्वतःची वाटचाल करणारा देश राहिला नसून, जागतिक समस्यांवर उपाय सुचवणारा आणि जगाला आशेची दिशा देणारा देश बनला आहे, असे ते म्हणाले.

भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पुढे जात असून, जीडीपीतील सातत्यपूर्ण वाढ ही देशाच्या बळकटीची साक्ष असल्याचे मोदींनी सांगितले. हीच गती कायम राहिल्यास, भारत लवकरच जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. विज्ञान, तंत्रज्ञान, क्रीडा यांसह विविध क्षेत्रांत भारत ठोस कामगिरी करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

दरम्यान, जागतिक पातळीवर नवी व्यवस्था आकार घेत असल्याचे सांगत पंतप्रधानांनी स्पष्ट केले की, दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या जागतिक रचनेनंतर आता नवा ‘ग्लोबल ऑर्डर’ उदयास येत आहे आणि त्याचा लाभ भारताला होत आहे. आज भारत विश्वासार्ह मित्र आणि व्यापार भागीदार म्हणून ओळखला जात असल्याचे त्यांनी सांगितले.

अलीकडच्या काळात भारताने जगातील प्रमुख नऊ देशांशी व्यापार करार केले असून, २७ देशांचा समावेश असलेला व्यापक करार हा ‘मदर ऑफ ऑल डील’ असल्याचेही त्यांनी नमूद केले. याचवेळी विरोधकांवर टीका करत, पूर्वीच्या सरकारांच्या काळात भारतासोबत व्यापार करार करण्यास देश तयार नव्हते, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला.

Tags:#PM Modi#India#India progress##Parliament#New Delhi news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
52
Read More →

Budget Session Begins: PM Modi Says Next 25 Years Are Crucial for India

Budget Session begins; PM Modi says next 25 years crucial for India’s growth, highlights reforms, welfare schemes, and Union Budget 2027.

Jan 29, 2026
25
Read More →

सिगारेटच्या किमतीत मोठी वाढ; पाकिटामागे 55 रुपयांपर्यंत दरवाढ

नव्या उत्पादन शुल्कामुळे सिगारेटच्या किमतीत मोठी वाढ झाली असून एका पाकिटामागे 22 ते 55 रुपयांपर्यंत दरवाढ होण्याची शक्यता आहे.

Feb 3, 2026
34
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com