India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, February 26, 2026
Loading latest news...
News26 February 20266 views

विदर्भ–मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती मालिका; चालू वर्षात १,९८७ घटनांची नोंद

P
Puja Nitnaware
Published in General
विदर्भ–मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांची वाढती मालिका; चालू वर्षात १,९८७ घटनांची नोंद

राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रतेने समोर आला आहे. चालू वर्षात पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांत मिळून १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.

मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा तीव्रतेने समोर आला आहे. चालू वर्षात पश्चिम विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांत मिळून १ हजार ९८७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. या भागांत दररोज सरासरी तीन शेतकरी मृत्यूला कवटाळत असल्याचे चित्र असून, ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. ही आकडेवारी महाराष्ट्र विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात उघड झाली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विविध सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला. सुलभा खोडके, अब्दुल सत्तार, जयंत पाटील, अमित देशमुख, नानाभाऊ पटोले तसेच विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे याबाबत स्पष्टीकरण मागितले. त्यावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण गंभीर असल्याचे मान्य केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाकडून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, असे त्यांनी सांगितले.

सरकारने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, २००९ ते २०२५ या कालावधीत पश्चिम विदर्भात २,००९, मराठवाड्यात १,१२९ तर जळगाव जिल्ह्यात २,७८३ आत्महत्यांची नोंद झाली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत २०० घटनांची नोंद झाली असून, चालू वर्षातील एकूण १,९८७ आत्महत्यांनी परिस्थितीची भीषणता अधोरेखित केली आहे.

कारणांचा वेध-

वाढलेला शेतीखर्च, पीकनुकसान, कर्जाचा वाढता बोजा आणि हमीभावाचा अभाव ही आत्महत्यांमागील प्रमुख कारणे असल्याचे सभागृहात नमूद झाले. नैसर्गिक आपत्तीनंतरची अपुरी मदत आणि बँकांकडून होणारी कर्जवसुली यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिक दबावाखाली येत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. मंत्र्यांनी या कारणांमध्ये काही प्रमाणात सत्यता असल्याचे कबूल केले.

दररोज तीन शेतकऱ्यांचे जाणारे जीव हे केवळ आकडे नसून ग्रामीण भागातील अस्थिर आर्थिक परिस्थितीचे द्योतक असल्याची भावना व्यक्त होत आहे. विरोधकांनी मात्र या प्रश्नावर दीर्घकालीन व परिणामकारक उपाययोजना जाहीर करण्याची मागणी केली आहे.

Tags:#Farmer suicides#Vidarbha#Marathwada#Mumbai news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
42
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
96
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com