India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, February 5, 2026
Loading latest news...
News5 February 20261 views

सॉरी चालणार नाही; ‘या’ तारखेपासून HSRP नंबरप्लेट नसल्यास थेट दंड!

P
Puja Nitnaware
Published in General
सॉरी चालणार नाही; ‘या’ तारखेपासून HSRP नंबरप्लेट नसल्यास थेट दंड!

राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहन सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) संदर्भात राज्य परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे.

नागपूर :राज्यातील वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. वाहन सुरक्षेसाठी अनिवार्य असलेल्या हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) संदर्भात राज्य परिवहन विभागाने आता कठोर भूमिका घेतली आहे. अंतिम मुदत संपून महिनाभर उलटल्यानंतरही मोठ्या प्रमाणात वाहने जुन्याच नंबरप्लेटवर धावत असल्याने, १८ फेब्रुवारीपासून कडक कारवाई सुरू होणार असल्याचे संकेत परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिले आहेत.

१५ दिवसांची शेवटची सवलत-

३१ डिसेंबर २०२५ पूर्वी HSRP साठी नोंदणी केलेल्या, मात्र अद्याप नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनधारकांना प्रशासनाने १५ दिवसांचा ‘ग्रेस पिरियड’ दिला आहे.

“वेळेत नोंदणी केलेल्या नागरिकांना संधी मिळावी, म्हणून १८ फेब्रुवारीपर्यंत प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे भिमनवार यांनी स्पष्ट केले.

मात्र, ३१ डिसेंबरनंतर नोंदणी करणारे किंवा अजूनही नोंदणी न केलेले वाहनधारक १,००० रुपयांच्या दंडास पात्र ठरणार आहेत.

पुणे-पिंपरीत परिस्थिती चिंताजनक-

पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात HSRP मोहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.या भागात पात्र वाहनांची संख्या २४,२८,५८९ इतकी असून, त्यापैकी केवळ ८,५७,२०९ वाहनधारकांनी HSRP साठी नोंदणी केली आहे. म्हणजेच अवघ्या ३५ टक्के वाहनांवरच नवीन नंबरप्लेट बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

राज्यभरात १ कोटीहून अधिक वाहने अजूनही जुन्या नंबरप्लेटवर असल्याचे वास्तव समोर आले असून, अंतिम मुदत उलटूनही वाहनधारकांकडून आवश्यक गांभीर्य दाखवले जात नसल्याचे चित्र आहे.

तपासणीदरम्यान कागदपत्रांचीही छाननी-

१८ फेब्रुवारीपासून होणाऱ्या कारवाईत केवळ नंबरप्लेटचीच तपासणी केली जाणार नाही, असा इशाराही परिवहन विभागाने दिला आहे.HSRP नसल्यामुळे थांबवण्यात आलेल्या वाहनांची नोंदणी प्रमाणपत्र (RC), वाहन विमा, पीयूसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांचीही तपासणी केली जाईल. यापैकी कोणतेही कागदपत्र अपूर्ण किंवा अनुपलब्ध आढळल्यास, दंडाची रक्कम अधिक वाढू शकते.

फिटमेंट सेंटर्स हैराण

HSRP बसवणाऱ्या शोरूम्स आणि फिटमेंट- सेंटर्ससमोरही मोठी अडचण निर्माण झाली आहे.अपॉइंटमेंट घेऊनही अनेक वाहनधारक ठरलेल्या वेळेला येत नाहीत, तर काहीजण कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक येतात. परिणामी, तयार असलेल्या नंबरप्लेट्सचा साठा केंद्रांमध्ये साचून राहिला असून, व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येत आहे.

Tags:#HSRP number plate#Direct penalty#Nagpur news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
28
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
55
Read More →

नागपूर भारत–न्यूझीलंड टी-२० लढतीसाठी सज्ज; टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला!

भारत–न्यूझीलंड टी-20 मालिकेतील पहिला सामना आज नागपूरच्या VCA स्टेडियमवर; एकदिवसीय पराभवानंतर भारत दमदार पुनरागमनाच्या तयारीत.

Jan 21, 2026
24
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com