India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, February 6, 2026
Loading latest news...
News21 January 202623 views

नागपूर भारत–न्यूझीलंड टी-२० लढतीसाठी सज्ज; टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला!

R
Rutuja
Published in General
नागपूर भारत–न्यूझीलंड टी-२० लढतीसाठी सज्ज; टीम इंडियाची प्रतिष्ठा पणाला!

भारत–न्यूझीलंड टी-20 मालिकेतील पहिला सामना आज नागपूरच्या VCA स्टेडियमवर; एकदिवसीय पराभवानंतर भारत दमदार पुनरागमनाच्या तयारीत.

नागपूर :भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेचा पहिला सामना आज (२१ जानेवारी) नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर रंगणार आहे. एकदिवसीय मालिकेत २–१ असा धक्का बसल्यानंतर, टी-२० क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करण्याच्या इराद्याने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.

ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मानली जात असून, संघरचना, डावपेच आणि खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मची कसोटी पाहण्याची संधी मिळणार आहे. आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृष्टीने हा सामना निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

फलंदाजी विभागावर नजर-

संघात अखेरच्या क्षणी काही बदल झाले असून, तिलक वर्मा पोटाच्या शस्त्रक्रियेमुळे पहिल्या तीन सामन्यांतून बाहेर आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या टॉप-ऑर्डरची जबाबदारी वाढली आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर संघाला भक्कम सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

मोठ्या स्पर्धांपूर्वी महत्त्वाची चाचणी-

भारतासाठी ही टी-२० मालिका आगामी महत्त्वाच्या स्पर्धांपूर्वीची शेवटची तयारी मानली जात आहे. २०२४ पासून सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय टी-२० संघाने प्रभावी कामगिरी केली असून, विजयाचे प्रमाण ७२ टक्क्यांपेक्षा अधिक राहिले आहे.

खास क्षणाची नोंद-

या सामन्यात सूर्यकुमार यादव नागपूरमध्ये संघाचे नेतृत्व करताना आपला १०० वा टी-२० सामना खेळणार असून, असा टप्पा गाठणारा तो भारताचा ५३ वा खेळाडू ठरणार आहे. भारतीय क्रिकेटसाठी हा क्षण विशेष मानला जात आहे.हा सामना आज सायंकाळी ७ वाजता जामठा येथील व्हीसीए स्टेडियमवर सुरू होणार असून, नागपूरमधील क्रिकेटप्रेमींमध्ये सामन्याबाबत प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

Tags:##Nagpur T20 Match##VCA Stadium Jamtha##Team India T20##Suryakumar Yadav Captain##Cricket News Marathi

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

दूसरी बार दूल्हा बनेंगे शिखर धवन, फरवरी में सोफी शाइन से रचाएंगे विवाह

पूर्व भारतीय क्रिकेटर शिखर धवन फरवरी 2026 में गर्लफ्रेंड सोफी शाइन से दिल्ली-एनसीआर में दूसरी शादी करने जा रहे हैं।

Jan 6, 2026
63
Read More →

Yuvraj Singh opens up about pain behind his Retirement”

Yuvraj Singh says lack of respect and support, not just injury or form, was the main reason behind his decision to retire from cricket.

Jan 29, 2026
21
Read More →

IPL 2026: BCCI के निर्देश पर KKR मुस्तफिजुर रहमान को करेगी रिलीज

BCCI ने IPL 2026 से पहले KKR को बांग्लादेशी तेज गेंदबाज मुस्तफिजुर रहमान को रिलीज करने का निर्देश दिया है।

Jan 3, 2026
17
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com