India Mornings
India Morning
Global News Portal
Wednesday, March 18, 2026
Loading latest news...
News13 March 202614 views

डायबिटीजसह उच्च रक्तदाबामुळे किडनी धोक्यात; निरोगी किडनीसाठी ‘या’ सवयी अंगीकारा

P
Puja Nitnaware
Published in General
डायबिटीजसह उच्च रक्तदाबामुळे किडनी धोक्यात; निरोगी किडनीसाठी ‘या’ सवयी अंगीकारा

सध्या वाढत्या डायबिटीज (मधुमेह) आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची चिंता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

किडनी ही शरीरातील अत्यंत महत्त्वाची अवयव प्रणाली मानली जाते. रक्तातील घातक व विषारी घटक बाहेर टाकणे, शरीरातील पाण्याचे संतुलन राखणे तसेच रक्तदाब नियंत्रित ठेवणे ही महत्त्वाची जबाबदारी किडनी पार पाडते. मात्र सध्या वाढत्या डायबिटीज (मधुमेह) आणि उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे किडनीच्या आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याची चिंता आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

जास्त साखरेमुळे किडनीच्या फिल्टरला धोका-

मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण दीर्घकाळ जास्त राहिल्यास किडनीमधील सूक्ष्म फिल्टर प्रणालीवर परिणाम होतो. किडनीतील नेफ्रॉन्स या सूक्ष्म यंत्रणांवर अतिरिक्त ग्लुकोजचा ताण पडतो. कालांतराने या फिल्टर्सना सूज येते किंवा त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी शरीरातील कचरा आणि अतिरिक्त द्रव बाहेर टाकण्याची क्षमता घटते. या अवस्थेला डायबेटिक किडनी डिसीज असे संबोधले जाते.

दीर्घकाळ बीपी वाढल्यास रक्तवाहिन्या खराब-

किडनीमध्ये असलेल्या लाखो सूक्ष्म रक्तवाहिन्या रक्त शुद्ध करण्याचे महत्त्वाचे काम करतात. मात्र दीर्घकाळ रक्तदाब जास्त राहिल्यास या रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. त्या अरुंद किंवा कठीण झाल्याने किडनीला होणारा रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे किडनीची कार्यक्षमता हळूहळू घटू लागते आणि पुढे किडनी निकामी होण्याचा धोका निर्माण होतो.

किडनी निरोगी ठेवण्यासाठी महत्त्वाचे उपाय-

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, काही साध्या सवयी अंगीकारल्यास किडनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवता येऊ शकते.

-नियमित शारीरिक व्यायाम केल्याने वजन नियंत्रणात राहते आणि रक्ताभिसरण सुधारते.

-रक्तातील साखर आणि रक्तदाब नियमित तपासून नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे.

-आहारात मिठाचे प्रमाण कमी ठेवल्यास बीपी नियंत्रित राहण्यास मदत होते.

-शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसभर पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.

-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधांचा जास्त वापर टाळणे आवश्यक आहे.

प्रतिबंध हाच सर्वोत्तम उपाय-

किडनीचे आजार अनेकदा सुरुवातीला कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाहीत. त्यामुळे विशेषतः मधुमेह किंवा बीपी असलेल्या रुग्णांनी नियमित वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. वर्षातून किमान एकदा लघवी आणि रक्त तपासणी केल्यास किडनीच्या समस्या वेळेत ओळखता येतात.

तज्ज्ञांच्या मते, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळेवर तपासणी या तीन गोष्टी अंगीकारल्यास किडनीचे आरोग्य दीर्घकाळ चांगले ठेवणे शक्य आहे.

Tags:#Diabetes#High blood pressure#Healthy kidneys#Health news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
55
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
118
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
34
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com