India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 5, 2026
Loading latest news...
News5 March 20268 views

‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान–२’ : तुमसर तालुक्यात प्रशासन नागरिकांच्या दारी

R
Rutuja
Published in General
‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान–२’ : तुमसर तालुक्यात प्रशासन नागरिकांच्या दारी

तुमसर तालुक्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान–2’ अंतर्गत नागरिकांच्या महसुली व शासकीय प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा.

तुमसर (०५ मार्च) : महसूल विभागाच्या वतीने तुमसर तालुक्यात नागरिकांच्या विविध शासकीय कामांचा तात्काळ निपटारा करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान–२’ अंतर्गत एकदिवसीय समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरांमधून नागरिकांच्या महसुली व इतर

शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित प्रकरणे सोडवण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे.

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांची ७/१२ उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अनुकंपा (NA) परवानगी, जमीन मोजणी अर्ज, रेशनकार्ड, पीएम किसान नोंदणी तसेच विविध सामाजिक योजनांचे लाभ यांसारखी कामे प्रलंबित राहतात. या सर्व प्रकरणांचा निपटारा एका ठिकाणी आणि कमी वेळेत व्हावा, या उद्देशाने हे शिबिर नागरिकांसाठी मोठी संधी ठरणार आहे..या शिबिरांमध्ये महसूल, कृषी, आरोग्य, परिवहन, ग्रामपंचायत, सामाजिक न्याय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकणार असून प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही केली जाणार आहे. तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व अर्ज स्वीकृतीची सुविधा देखील उपलब्ध राहणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ७ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

या संदर्भात तहसील कार्यालय, तुमसर येथे आयोजित माध्यम प्रतिनिधींच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार उपेश अंबादे यांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित ठिकाणी उपस्थित राहून या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या बैठकीस नंदकिशोर वाळेकर (गट विकास अधिकारी), सुहास तिरपुडे (मुख्याधिकारी, नगर परिषद तुमसर), हरिदास नारनवरे (उपअधीक्षक, भूमिअभिलेख विभाग), दुर्गेश्वरी एकतपुरे (तालुका कृषी अधिकारी), जांभूळकर (नायब तहसीलदार) तसेच व्हॅनखेडे (नायब तहसीलदार) यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्रशासनाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना विविध शासकीय सेवांचा लाभ त्यांच्या दारीच मिळणार असून, नागरिकांनी जागरूकतेने या शिबिरात सहभागी होऊन प्रलंबित कामे मार्गी लावावीत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Tags:#Chhatrapati Shivaji Maharaj Samadhan Shibir#Tumsar Administration Camp#Maharashtra Government Scheme#Revenue Department Camp#Government Services Camp

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
45
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
104
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
26
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com