तुमसर : रयतेच्या राजा, आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिव प्रहार युवा शक्ती संघटना आणि शिवसेना युवासेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले. तुमसर तालुक्यातील देव्हाडी उड्डाणपूल येथील शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण व पूजन करून त्यांच्या चरणी वंदन करून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आले. यावेळी तुमसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा महाविकास आघाडीचे नेते चरण वाघमारे यांनी महाराजांना अभिवादन करत सर्व नागरिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मनोज चौबे, अमित मेश्राम, शिवप्रसाद लिल्हारे, निखील बशीने, संजय झंझाड, संदीप वाट, मोनू तिवारी, शारदा बंधाटे, विनोद कोकुडे, प्रफुल्ल बाणासुरे, प्रदीप बोन्द्रे, सत्यनारायण कामथे, देवांश घुले, भाऊराव कस्तुरे, वीरेंद्र दमाहे यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
News• 19 February 2026•6 views
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
रयतेच्या राजा, आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती शिव प्रहार युवा शक्ती संघटना आणि शिवसेना युवासेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आले.
Tags:#chhatrapati shivaji maharaj#Birth anniversary#Tumsar News#Maharashtra news

