India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 10, 2026
Loading latest news...
News10 March 202611 views

चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक १६ मार्चला; संख्याबळामुळे रंगणार चुरशीची लढत

P
Puja Nitnaware
Published in General
चंद्रपूर मनपाच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक १६ मार्चला; संख्याबळामुळे रंगणार चुरशीची लढत

महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून १६ मार्च रोजी नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.

चंद्रपूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख निश्चित झाली असून १६ मार्च रोजी नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीकडे शहरातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

निवडणूक प्रक्रियेअंतर्गत ११ व १२ मार्च रोजी उमेदवारी अर्ज घेता येणार असून १३ मार्च रोजी अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत.

स्थायी समितीत एकूण १६ सदस्य आहेत. त्यापैकी भारतीय जनता पक्षाचे ६, काँग्रेसचे ७, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे २ आणि जनविकास सेनेचा १ सदस्य आहे.

संख्याबळ पाहता भाजप-शिवसेना गटाकडे ८ सदस्य आहेत, तर काँग्रेस व त्यांच्या सहकाऱ्यांकडेही ८ सदस्य आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात बरोबरीची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे अध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निकाल निर्णायक मताने लागणार की चिठ्ठीद्वारे ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीची तारीख जाहीर होताच काँग्रेस, भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांसह प्रमुख पक्षांनी अध्यक्षपद मिळवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महानगरपालिकेच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाल वाढल्याचे दिसून येत आहे.

Tags:#Chandrapur Municipal Corporation#Standing Committee Chairman#Election#Chandrapur news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
49
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
112
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
28
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com