India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, March 14, 2026
Loading latest news...
News14 March 20266 views

भाजपला मोठा धक्का; तीन वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा

R
Rutuja
Published in General
भाजपला मोठा धक्का; तीन वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा

ओडिशात भाजपला मोठा धक्का; तीन वेळा आमदार राहिलेले जीवन प्रदीप दैश यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

भुवनेश्वर : राज्यात निवडणुकांची चाहूल लागताच राजकीय वातावरण तापू लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर आणि राजीनाम्यांची मालिकाही सुरू झाली आहे. अशातच भाजपला मोठा धक्का बसला असून तीन वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेते जीवन प्रदीप दैश यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

चार दिवसांपूर्वी एका आर्थिक घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी खासदार रवींद्र कुमार यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. या निर्णयाला दैश यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. मात्र भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यांच्या आक्षेपाची दखल न घेतल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली.पत्रकार परिषदेत बोलताना दैश यांनी भाजपवर जोरदार टीका केली. “ओडिशामध्ये २०२४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजपमध्ये आता नैतिकता उरलेली नाही. केंद्रीय तपास संस्थांच्या चौकशीत अडकलेला आणि जामिनावर बाहेर आलेला माजी खासदार पक्षात घेतला जात असेल, तर पक्ष आपल्या मूलभूत मूल्यांपासून दूर गेला आहे,” असा आरोप त्यांनी केला.

यावेळी त्यांनी राज्य नेतृत्वावरही निशाणा साधला. चिटफंड घोटाळ्यात आरोपी असलेल्या व्यक्तीला पक्षात प्रवेश देऊन भाजपने नीतीमत्ता गमावली असल्याचा आरोप त्यांनी केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजीनामा दिल्याने राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जीवन दैश हे भारतीय वायु सेनेचे माजी सैनिक आहेत. २००० साली त्यांनी भाजपच्या तिकीटावर प्रथम आमदार म्हणून विजय मिळवला. त्यानंतर त्यांनी बीजेडीमध्ये प्रवेश केला आणि २००९ व २०१४ मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले. मात्र २०२० मध्ये काही कारणांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता त्यांच्या राजीनाम्यामुळे ओडिशाच्या राजकारणात नवा राजकीय समीकरणांचा अंदाज वर्तवला जात आहे.

Tags:#Jiban Pradip Das Resignation#BJP Odisha News#Odisha Political News#Ravindra Kumar BJP Entry#BJD Leader History

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
52
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
114
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
65
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
भाजपला मोठा धक्का; तीन वेळा आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा - India Morning