India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, February 14, 2026
Loading latest news...
News14 February 20261 views

नागपुरात ड्रग्जविरोधी धडक कारवाई; १.०२ कोटींचा एमडी साठा जप्त

P
Puja Nitnaware
Published in General
नागपुरात ड्रग्जविरोधी धडक कारवाई; १.०२ कोटींचा एमडी साठा जप्त

शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई

नागपूर : शहरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत तब्बल ५१२ ग्रॅम मेथिलीनडायऑक्सी मेथॅम्फेटामाईन (एमडी) पावडर जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार या साठ्याची किंमत सुमारे १ कोटी २ लाख ४० हजार रुपये इतकी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी ५१ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली आहे.

१३ फेब्रुवारी रोजी उशिरा रात्री गणेशपेठ परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना राजाराम देवी चौक, सुभाष रोड येथील अभ्यंकर भवन परिसरात एमडीची विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून दुचाकीवर आलेल्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्या वाहनाच्या डिकीतून मोठ्या प्रमाणात एमडी पावडर आढळून आली.

चौकशीत आरोपीने आपले नाव संजय रामप्रसाद गंगवानी (रा. गणेशपेठ) असे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून तीन मोबाईल फोन, एक हेल्मेट आणि ४१ हजार रुपये रोखही जप्त केले. एकूण मुद्देमालाची किंमत १ कोटी ३ लाख ८२ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले.

तपासात या प्रकरणाचे धागेदोरे मध्य प्रदेशातील इंदूरपर्यंत पोहोचले असून, तेथील एका फरार साथीदाराने खासगी वाहतूक कुरिअरमार्फत हा साठा पाठविल्याचे उघड झाले आहे. संबंधित फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

या घटनेप्रकरणी गणेशपेठ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ आणि मनःप्रभावी पदार्थ कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली.

Tags:#Nagpur news#MD seized#Maharashtra news#Anti drug operation

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
37
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
80
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
19
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
नागपुरात ड्रग्जविरोधी धडक कारवाई; १.०२ कोटींचा एमडी साठा जप्त - India Morning