India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, March 3, 2026
Loading latest news...
News28 February 20262 views

तुमसर नगरपरिषदेच्या ताफ्यात वातानुकूलित शववाहिनी दाखल

P
Puja Nitnaware
Published in General
तुमसर नगरपरिषदेच्या ताफ्यात वातानुकूलित शववाहिनी दाखल

नागरिकांची प्रतीक्षा संपली, राज्य शासनाकडून हस्तांतरण

तुमसर : तुमसर शहर आणि परिसरातील नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित एका अत्यंत संवेदनशील आणि दीर्घ प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाच्या वतीने तुमसर नगरपरिषदेला बहुप्रतीक्षित अत्याधुनिक वातानुकूलित शववाहिनी उपलब्ध करून देण्यात आली असून, गुरुवारी त्याचे औपचारिक हस्तांतरण करण्यात आले. या नव्या सुविधेमुळे तुमसरकरांना आता दुःखाच्या प्रसंगी मोठी मदत मिळणार आहे.

शहरात आतापर्यंत अत्याधुनिक शववाहिनीचा अभाव होता. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा मृतदेह लांबच्या अंतरावर न्यायचा असल्यास नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागत असे. प्रवासादरम्यान मृतदेहाची सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने अनेक अडचणी निर्माण होत होत्या. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने राज्य शासनाकडे पाठपुरावा केला होता. आता वातानुकूलित यंत्रणा असलेल्या या वाहनामुळे मृतदेहाची वाहतूक अधिक सुरक्षित, निजंर्तुक आणि सन्मानपूर्वक पद्धतीने करणे शक्य होणार आहे. शववाहिनी नगरपरिषदेत दाखल होताच तिचे पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले. याप्रसंगी तुमसरचे नगराध्यक्ष सागर गभने, उपाध्यक्ष सचिन बोपचे, लेखापाल इंगलेश्वरी कनसरे, रितेश भाजीपाले, पूजा सूर्यवंशी, शांतनू रसाटे, अशोक शर्मा, मोहन वासनिक, अधिकारी तसेच नगर परिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहराच्या आरोग्य व्यवस्थेत ही शववाहिनी एक महत्त्वाची भर ठरेल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.

ग्रामीण भागातील लोकांसाठीही उपयुक्त ठरणार...

ही सेवा केवळ शहरासाठीच नव्हे, तर ग्रामीण भागातील लोकांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. ही सेवा मिळवण्यासाठी नागरिकांना कोणतीही धावपळ करावी लागू नये आणि ती अत्यंत सुलभ व पारदर्शक पद्धतीने मिळावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नगर परिषदेच्या या नव्या सुविधेबद्दल शहरवासीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

Tags:#Hearse#Tumsar Municipal Council#Tumsar News#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
43
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
96
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
22
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
तुमसर नगरपरिषदेच्या ताफ्यात वातानुकूलित शववाहिनी दाखल - India Morning