India Mornings
India Morning
Global News Portal
Sunday, March 1, 2026
Loading latest news...
News1 March 20261 views

काटोल स्फोट प्रकरण १७ कामगारांचा मृत्यू;कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी; गडकरींची प्रतिक्रिया

P
Puja Nitnaware
Published in General
काटोल स्फोट प्रकरण १७ कामगारांचा मृत्यू;कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी; गडकरींची प्रतिक्रिया

नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी या दारुगोळा निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांना प्राण गमवावे लागल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे.

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी या दारुगोळा निर्मिती कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात १७ कामगारांना प्राण गमवावे लागल्याची अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. या दुर्घटनेबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

घटनेवर प्रतिक्रिया देताना गडकरी यांनी म्हटले की, “या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व कामगारांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. या कठीण प्रसंगी त्यांना धैर्य लाभो, हीच प्रार्थना.”

याशिवाय, जखमी कामगारांच्या प्रकृतीची चौकशी करत त्यांनी तातडीने योग्य उपचार मिळावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिल्याचे सांगितले. “जखमींनी लवकर बरे व्हावे आणि त्यांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, स्फोटानंतर प्रशासन आणि आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Tags:#Nitin Gadkari#Katol blast case#Massive explosion#17 workers killed#Katol news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
97
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
59
Read More →

अर्जुन तेंदुलकर की शादी में शामिल होंगे डिप्टी सीएम एकनाथ शिंदे, सचिन तेंदुलकर ने दिया न्योता

भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज बल्लेबाज़ सचिन तेंदुलकर ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे को अपने बेटे अर्जुन तेंदुलकर के विवाह समारोह में शामिल होने के लिए आमंत्रित किया है।

Feb 19, 2026
26
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
काटोल स्फोट प्रकरण १७ कामगारांचा मृत्यू;कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी; गडकरींची प्रतिक्रिया - India Morning