India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, March 23, 2026
Loading latest news...
News23 March 20264 views

रेल्वे नोकरीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; पतीकडून १० लाखांची फसवणूक, आरोपी फरार

P
Puja Nitnaware
Published in General
रेल्वे नोकरीच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; पतीकडून १० लाखांची फसवणूक, आरोपी फरार

डोंबिवली परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

कल्याण : डोंबिवली परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून रेल्वेत नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेला जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात आरोपीने वेगवेगळी नावे वापरून विश्वास संपादन केल्याचे उघड झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीने महिलेला नोकरीच्या बहाण्याने घरी बोलावून तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्याने तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या आधारे तो अनेक वर्षे तिचे लैंगिक शोषण करत राहिला.

इतक्यावर न थांबता, आरोपीने पीडित महिलेच्या पतीलाही रेल्वे कंत्राट मिळवून देण्याचे आश्वासन देत तब्बल १० लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे. काही काळानंतर पतीला फसवणुकीचा संशय आल्याने त्याने पत्नीशी चर्चा केली असता संपूर्ण प्रकार उघड झाला. यामुळे पतीला मोठा मानसिक धक्का बसला.

यानंतर दोघांनीही तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे रामनगर पोलिसांनी संबंधित आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते.

दरम्यान, आरोपी हा व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करत असून वसुलीसाठी महिलांकडून अश्लील मागण्या केल्याचे आरोपही समोर येत आहेत. या प्रकरणी आणखी काही महिलांनीही पुढे येत तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे.

विशेष म्हणजे, अटक टाळण्यासाठी आरोपीने कल्याण सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावल्याची माहिती फिर्यादीच्या वकिलांनी दिली आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असून लवकरच अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags:#Woman raped#Crime news#Mumbai news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
55
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
119
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
9
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com