India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, March 9, 2026
Loading latest news...
News17 February 202616 views

शहरातील भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडवू

P
Puja Nitnaware
Published in General
शहरातील भेडसावणाऱ्या समस्या प्राधान्याने सोडवू

तुमसर सिहोरा मार्गावर सध्या समस्यांनी घर केले आहे. स्थानिकांच्या तक्रारी व त्यावर उपाय योजनेच्या उठणाऱ्या शाब्दिक मागण्यांवर तुमसर पालिकेचे उपाध्यक्ष सचिन बोपचे सध्या सरसावले आहेत.

तुमसर: शहर हद्दीत येणाऱ्या सिहोरा मार्गावर सध्या समस्यांनी घर केले आहे. स्थानिकांच्या तक्रारी व त्यावर उपाय योजनेच्या उठणाऱ्या शाब्दिक मागण्यांवर तुमसर पालिकेचे उपाध्यक्ष सचिन बोपचे सध्या सरसावले आहेत. आपल्या दालनांत स्थानिकांच्या प्रत्येक समस्यांना बोपचे सध्या प्राधान्य देताना दिसत आहेत. याचाच भाग असलेल्या सिहोरा महामार्गावर डोंगराला स्मशान भूमी दरम्यान दुर्लक्षित झालेल्या विसावा परिसरात बोपचे यांनी व्यक्तिशः उपस्थित राहून स्वच्छ्ता अभियान राबवून घेतले. तसेच त्या ठिकाणी नियमित रित्या सफाई कामगारांना तत्पर राहण्याच्या सूचना देखील त्यावेळी बोपचे यांनी दिल्या. सदर कर्तव्य बजावून उपाध्यक्षांनी समस्या तथा तक्रारींना निवेदनापुर्ते मर्यादित न ठेवता त्याचे कृतीबद्ध नियोजन आखून स्थायी उपाय योजना राबविण्यावर भर देण्याचा मानस बोपचे यांनी त्यावेळी व्यक्त केला आहे. त्यात सध्या नगर पालिका तुमसर येथे नवीन विकास कामांचा आराखडा अद्याप मांडण्यात आलेला नाही. मात्र येत्या निकट काळात विकास कामांना चालना देणारे उपक्रम, शहराची प्रगती, नित्य भेडसावणाऱ्या समस्या, मोठे प्रकल्प देखील हाती घेणार असल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले.

नगर पालिकेच्या दुसऱ्या कार्यकाळात सचिन बोपचे यांना सभापतीसह उपाध्यक्षांचे पद लाभले आहे. त्यातून शहरातील नागरिकांच्या मागण्या, त्यांच्या गरजा, मूलभूत सुविधा, कामांचा तथा गरजांची पूर्तता करता यावी याकरिता पालिकेत बोपचे यांनी आपले स्वतंत्र दालन सर्वसामान्यांकरिता नेहमीच खुले असल्याचा दावा केला आहे. पालिकेत येताना कुठल्याही अडचणी आल्यास, कामांत अडथळा आल्यास थेट भेट देऊन त्याच्याशी अवगत करण्याची जनतेला बोपचे यांनी विनंती केली आहे. त्यातूनच बोपचे यांच्या दालनातील गर्दी आणि भेटणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याची चर्चा शहरात सर्वदूर केली जात आहे.

"प्रशासकीय कामे आणि सामान्य जनता यातील दुवा म्हणून जन प्रतिनिधी काम पाहतात. याहून अधिकचे महत्त्व कुठल्याही कामाला अथवा पदाला नाही. याची जाणीव ठेवून सगळ्यांना सामना न्याय देण्याची माझी भूमिका नेहमी राहील. युवा पिढीकडून देखील नावीन्यपूर्ण उपक्रम तथा योजनांच्या सूचना देखील प्राप्त होत आहेत. त्यामुळे येत्या काळात नक्कीच काही नवीन बदल शहरात घडून येथील यात काही शंका नाही." -सचिन बोपचे, उपाध्यक्ष, नगरपरिषद तुमसर

Tags:#Tumsar Municipality Vice#Chairman Sachin Bopche#Tumsar News#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
47
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
110
Read More →

झाडावरुन पडला कामगार, पोटाला चिरून निघाली लोखंडी अँगल

तुमसर तालुक्यातील माडगी येथील CBSE शाळेत झाडावरून पडून कामगाराच्या पोटाला लोखंडी अँगल चिरली. प्रकृती गंभीर.

Feb 10, 2026
28
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com