India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, April 18, 2026
Loading latest news...
News16 April 202611 views

विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर

T
Tanay
Published in General
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी १२ मे रोजी मतदान; निवडणूक आयोगाचा कार्यक्रम जाहीर

१२ मे रोजी विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी मतदान; चुरशीची निवडणूक अपेक्षित

महाराष्ट्र विधानपरिषदेतील ९ रिक्त जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी १२ मे रोजी मतदान होणार असून मतदानाची प्रक्रिया सकाळी ९ वाजता सुरू होऊन दुपारी ४ वाजेपर्यंत पार पडणार आहे. मतदान संपताच त्याच दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

विधानपरिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपत असल्याने ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजपला पाच, शिवसेनेला दोन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि महाविकास आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या अतिरिक्त मतांमुळे आणि महायुतीकडून संभाव्य अतिरिक्त उमेदवार देण्याच्या शक्यतेमुळे निवडणूक बिनविरोध न होता चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या निवडणुकीत उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे.

विधानसभेतील विद्यमान संख्याबळ पाहता महायुतीकडे स्पष्ट बहुमत आहे. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असून भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या एकत्रित संख्याबळाच्या आधारावर महायुतीचे मोठ्या संख्येने उमेदवार सहज विजयी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर महाविकास आघाडीला मर्यादित संख्याबळामुळे केवळ एकच जागा निश्चित मानली जात आहे, दुसऱ्या जागेसाठी त्यांना अतिरिक्त मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

Tags:#MaharashtraCouncilElection#ElectionCommission#VotingMay12#PoliticalBattle#Mahayuti MVA

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
64
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
136
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
27
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com