India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, April 7, 2026
Loading latest news...
News7 April 20261 views

नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह दोन तस्कर जेरबंद

P
Puja Nitnaware
Published in General
नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह दोन तस्कर जेरबंद

शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत जोरदार मोहीम सुरू केली असून, पाचपावली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ससह दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

नागपूर : शहरातील अमली पदार्थांच्या वाढत्या साखळीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत जोरदार मोहीम सुरू केली असून, पाचपावली पोलिसांनी केलेल्या कारवाईत एमडी ड्रग्ससह दोन तस्करांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी पाचपावली पोलिसांनी सापळा रचला. वैशाली नगर परिसरातील आंबेडकर गार्डन, कलकत्ता रेल्वे लाईनजवळ संशयास्पद हालचाल करणाऱ्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत आरोपींची ओळख शेख आदिल शेख रशीद आणि आशीष रामटेके अशी पटली. त्यांच्या अंगझडतीदरम्यान दोन झिपलॉक पाउचमध्ये एकूण १२.४९ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली. जप्त केलेल्या ड्रग्सची अंदाजे किंमत ९४ हजार ७२० रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आरोपींना एमडी ड्रग्सचा पुरवठा नेमका कुठून होत होता, याचा मागोवा घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. शहरात अमली पदार्थांच्या जाळ्याचा विस्तार रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Tags:#Two smugglers arrested#Operation Thunder#Nagpur news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
60
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
132
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
19
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
नागपुरात ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत मोठी कारवाई; एमडी ड्रग्ससह दोन तस्कर जेरबंद - India Morning