India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, April 20, 2026
Loading latest news...
News16 April 202611 views

शेताला पाणी नाही, पण खरातला पाणी मिळतं;राज ठाकरेंचा खरात प्रकरणावर सरकारवर हल्लाबोल

T
Tanay
Published in General
शेताला पाणी नाही, पण खरातला पाणी मिळतं;राज ठाकरेंचा खरात प्रकरणावर सरकारवर हल्लाबोल

राज ठाकरे यांचा खरात प्रकरणावर सरकार व माध्यमांवर जोरदार हल्ला

मुंबई : राज्यात चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर प्रतिक्रिया देत सरकार आणि व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे झालेल्या कै. काकासाहेब पुरंदरे सन्मान सोहळ्यात बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर आपले स्पष्ट आणि परखड मत मांडले.

राज ठाकरे म्हणाले की, “जिथे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचत नाही, तिथे खरातसारख्या प्रकरणात मात्र सगळं सुरळीत चालतं.” अशा घटनांचा वापर विशिष्ट हेतूंसाठी केला जात असल्याचा सूचक आरोपही त्यांनी यावेळी केला. या प्रकारांमुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असेही ते म्हणाले.

यावेळी त्यांनी माध्यमांवरही अप्रत्यक्ष टीका केली. आजची पत्रकारिता ‘काहीतरी घेऊन या’ या दडपणाखाली चालते, त्यामुळे अनेकदा बातम्या अतिरंजित पद्धतीने समोर येतात, असे त्यांनी नमूद केले. काही माध्यमे आणि पत्रकार सत्ताधाऱ्यांच्या जवळ काम करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

वृत्तपत्र सुरू करण्याबाबतही त्यांनी भाष्य केले. जाहिरातींवर अवलंबून असलेल्या माध्यम व्यवस्थेत स्वतंत्रपणे काम करणे कठीण असल्याने वृत्तपत्र सुरू करण्याचा विचार त्यांनी पुढे नेला नाही, असे ते म्हणाले.

Tags:##RajThackeray#AshokKharatcase##MaharashtraPolitics#MediaCriticism#FarmerIssues

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवत सायबर फसवणूक; मोबाईल हॅक करून १०.३० लाखांची लूट

सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची नवी पद्धत अवलंबत गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी देऊन नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत.

Apr 8, 2026
6
Read More →

राज्यावर थकबाकीचा डोंगर; कंत्राटदारांचा ‘काम बंद’ इशारा, विकासकामे अडचणीत

राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर देयके रखडल्याने कंत्राटदारांनी आक्रमक पवित्रा घेत ‘काम बंद’ आंदोलनाची घोषणा केली आहे.

Apr 8, 2026
19
Read More →

Link found? Action will follow: CM warns in Kharat case

Maharashtra CM Devendra Fadnavis said that just having a photo “Link Found? Action Will Follow: CM Warns in Kharat Case”

Mar 24, 2026
8
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com