India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 5, 2026
Loading latest news...
News3 February 20266 views

पुणे महापालिकेला नवी महापौर; मंजूषा नागपुरेंची बिनविरोध निवड

R
Rutuja
Published in General
पुणे महापालिकेला नवी महापौर; मंजूषा नागपुरेंची बिनविरोध निवड

पुणे महापालिकेच्या महापौरपदी भाजपच्या मंजूषा नागपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित; राष्ट्रवादीने उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला.

पुणे:पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका मंजूषा नागपुरे यांची निवड निश्चित झाली असून शहराच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाची नवी सुरुवात झाली आहे. महापौरपदाची निवडणूक बिनविरोध होत असल्याने आता केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतर राष्ट्रवादीने महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेचा हा परिणाम मानला जात असून त्यामुळे भाजपचा मार्ग सुकर झाला आहे.

सिंहगड रोड परिसराला पहिल्यांदाच महापौरपद-

मंजूषा नागपुरे या सिंहगड रोड परिसरातून सलग तिसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्या प्रभाग क्रमांक 35, सनसिटी–माणिकबाग येथून बिनविरोध विजयी झाल्या होत्या. त्यांच्या निवडीमुळे या भागाला प्रथमच महापौरपदाचा मान मिळाला आहे.

महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचा निर्णय आधीच ठरल्याने प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया पार पडलेली नाही. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली.

उपमहापौरपदी परशुराम वाडेकर-

महापौरपदासोबतच उपमहापौरपदासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे परशुराम वाडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पक्षाच्या बैठकीत या दोन्ही नावांची अधिकृत माहिती दिली.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही जल्लोष, फटाके, बॅनर किंवा गुलाल टाळण्याच्या सूचना भाजपकडून नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.

भाजपची एकहाती सत्ता, महिलांचे प्रतिनिधित्व वाढले-

पुणे महापालिकेत भाजपचे एकूण 119 नगरसेवक निवडून आले असून पालिकेवर पक्षाची भक्कम सत्ता प्रस्थापित झाली आहे. यंदा महापौरपद सर्वसाधारण गटातील महिलेसाठी राखीव होते. भाजपने मोठ्या संख्येने महिलांना उमेदवारी दिली असून 50 हून अधिक महिला नगरसेविका निवडून आल्या आहेत.

या निवडीमुळे पुणे महानगरपालिकेत महिलांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले असून शहराच्या कारभारात नवे पर्व सुरू झाल्याचे चित्र आहे.

Tags:##Pune Mayor election##Manjusha Nagpure mayor##Pune Municipal Corporation news##NCP decision no candidate##Singhad Road first mayor

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
103
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
59
Read More →

High alert after Trump’s warning, Americans told to leave 14 Nations

Fighting between the United States and Iran has become very serious.

Mar 3, 2026
4
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com