India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, February 5, 2026
Loading latest news...
News5 February 20262 views

पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग ३२ तासांनंतर खुला; प्रशासनावर टीकेची झोड, प्रवासी संतप्त

P
Puja Nitnaware
Published in General
पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग ३२ तासांनंतर खुला; प्रशासनावर टीकेची झोड, प्रवासी संतप्त

मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अखेर तब्बल ३२ तासांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे.

पुणे:मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक अखेर तब्बल ३२ तासांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाली आहे. आडोशी बोगद्याजवळ अपघातग्रस्त झालेला गॅस वाहतूक करणारा कॅप्सूल टँकर क्रेनच्या मदतीने हटवण्यात आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

रात्री १.४० वाजता पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहनांना सोडण्यात आले. सध्या दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असली, तरी मोठ्या प्रमाणात वाहने अडकल्याने रांगा कमी होण्यासाठी वेळ लागत आहे. दीर्घकाळ कोंडीत अडकलेल्या प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असला, तरी त्यांच्या मनातील नाराजी कायम आहे.

मंगळवारी सायंकाळी सुमारे पाचच्या सुमारास आडोशी बोगद्याजवळ ज्वालाग्रही गॅसने भरलेला टँकर पलटी झाला होता. अपघातानंतर टँकरमधून प्रोफोलिन गॅसची गळती सुरू झाल्याने सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही बाजूंची वाहतूक तात्काळ बंद करण्यात आली. गॅस लिकेज नियंत्रणात आणल्यानंतर काही काळासाठी मर्यादित वाहतूक सुरू करण्यात आली; मात्र धोका लक्षात घेता ती पुन्हा थांबवावी लागली.

त्यानंतर अपघातग्रस्त टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये स्थानांतरित करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. टँकरमध्ये अल्प प्रमाणात गॅस शिल्लक राहिल्यानंतर चार क्रेनच्या सहाय्याने टँकर पूर्णपणे बाजूला करण्यात आला आणि महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

या घटनेमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. अनेक वाहनचालक १५ ते २० तास वाहतूक कोंडीत अडकले होते. टोल भरूनही इतक्या मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करत जीव मुठीत धरून प्रवास केला.

या कोंडीत लहान मुले, वृद्ध आणि गंभीर आजाराचे रुग्ण अडकले होते. वेळेत वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेकांचे हाल झाले. त्यामुळे एका टँकरच्या अपघातामुळे संपूर्ण द्रुतगती मार्ग तब्बल ३२ तास बंद ठेवण्याची वेळ का आली, प्रशासनाने वेळीच प्रभावी उपाययोजना का केल्या नाहीत, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी जबाबदारांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags:#Pune-Mumbai Expressway#Passengers angry#Pune news#Maharashtra news#After 32 hours

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
28
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
55
Read More →

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Jan 18, 2026
23
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com