India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, February 24, 2026
Loading latest news...
News24 February 202623 views

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शेगाव दौऱ्यावर; महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन, मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त

P
Puja Nitnaware
Published in General
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या शेगाव दौऱ्यावर; महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन, मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शेगाव शहरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

बुलढाणा : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या २५ फेब्रुवारी रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण शेगाव शहरात उच्चस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. राज्यातील तब्बल दहा जिल्ह्यांतील पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले असून मंदिर परिसर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

राष्ट्रपतींच्या दौऱ्यात त्या संत गजानन महाराज मंदिर येथे दर्शनासाठी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने येणाऱ्या प्रत्येक भाविकाची कसून तपासणी केली जात आहे. जिल्हाधिकारी, बुलढाणा यांच्या निर्देशानुसार राष्ट्रपतींना सर्वोच्च राजशिष्टाचार प्रदान करण्यात येणार असून त्यानुसार विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दर्शन वेळेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. २४ फेब्रुवारी रोजी प्रशासनाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात येणार असल्याने सकाळी १०.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत दर्शन स्थगित राहणार आहे. तसेच २५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रपतींच्या आगमनामुळे सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत श्रींचे दर्शन बंद ठेवण्यात येईल. त्यानंतर दर्शन व्यवस्था पूर्ववत सुरू होणार असल्याचे संस्थानतर्फे जाहीर करण्यात आले आहे. भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रपती सकाळी हेलिकॉप्टरने शेगावात दाखल होतील. सर्वप्रथम त्या मंदिरात जाऊन संतांच्या समाधीचे दर्शन घेतील. त्यानंतर विसावा परिसरात आयोजित राष्ट्रीय आयुष मेळाव्यात त्या उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रशासन आणि पोलीस यंत्रणा दौऱ्याच्या तयारीत व्यस्त असून शेगाव शहरात चोख सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे.

Tags:#President#Draupadi Murmu#Maha Arogya Mela#Inauguration#Buldahana news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
91
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
58
Read More →

अर्जुन तेंदुलकर की शादी में शामिल होंगे डिप्टी सीएम एकनाथ शिंदे, सचिन तेंदुलकर ने दिया न्योता

भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज बल्लेबाज़ सचिन तेंदुलकर ने महाराष्ट्र के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे को अपने बेटे अर्जुन तेंदुलकर के विवाह समारोह में शामिल होने के लिए आमंत्रित किया है।

Feb 19, 2026
19
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com