India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, April 17, 2026
Loading latest news...
News7 March 202648 views

UPSC निकालात नागपूरची दमदार कामगिरी; प्रज्ज्वल नसरे आणि भाग्यश्री नाईकेले यांचे यश

P
Puja Nitnaware
Published in General
UPSC निकालात नागपूरची दमदार कामगिरी; प्रज्ज्वल नसरे आणि भाग्यश्री नाईकेले यांचे यश

प्रतिष्ठेच्या Union Public Service Commission (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नागपूर आणि विदर्भातील दोन तरुणांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली क्षमता सिद्ध केली आहे.

नागपूर : प्रतिष्ठेच्या Union Public Service Commission (UPSC) नागरी सेवा परीक्षेत नागपूर आणि विदर्भातील दोन तरुणांनी उल्लेखनीय यश संपादन करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. प्रज्ज्वल नसरे आणि भाग्यश्री नाईकेले यांच्या मेहनतीमुळे त्यांच्या कुटुंबासह परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

प्रज्ज्वल नसरे याने UPSC परीक्षेत ६७७ वा क्रमांक मिळवत महत्त्वपूर्ण यश मिळवले. वर्धा जिल्ह्यातील कारंजा गाडगे तालुक्यातील ठाणेगाव या छोट्या गावातील प्रज्ज्वल हा शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील धनराज नसरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.

प्रज्ज्वलने २०२३ मध्ये बीएची पदवी घेतली, तर २०२५ मध्ये राज्यशास्त्र विषयात एमए पूर्ण केले. शिक्षणानंतर त्याने नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. तिसऱ्या प्रयत्नात त्याने यश मिळवले. दुसऱ्या प्रयत्नात तो मुख्य परीक्षा आणि मुलाखतीपर्यंत पोहोचला होता; मात्र अंतिम निवड थोडक्यात राहिली होती. विशेष म्हणजे, कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार न घेता त्याने ऑनलाइन मार्गदर्शन आणि स्वतःच्या जिद्दीच्या जोरावर हे यश मिळवले.

दरम्यान, नागपूरच्या दिघोरी परिसरातील रहिवासी भाग्यश्री नाईकेले हिनेही UPSC परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिचे वडील राजेश नाईकेले हे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतात. साध्या कुटुंबातून आलेल्या भाग्यश्रीने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी सातत्याने मेहनत घेतली.

बीएससीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने पूर्णवेळ UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. मागील वर्षी तिने UPSC परीक्षेत ७३७ वा क्रमांक मिळवत Indian Railway Management Service (IRMS) सेवेत निवड मिळवली. सध्या ती Hyderabad येथे प्रशिक्षण घेत आहे.

प्रशिक्षणादरम्यानही तिने पुन्हा परीक्षा देत आपला क्रमांक सुधारला आणि यावेळी ६४७ वा क्रमांक मिळवत आणखी मोठी कामगिरी केली. त्यांच्या या यशामुळे नागपूरसह संपूर्ण विदर्भात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Tags:#UPSC#Prajjwal Nasre#Bhagyashree Naikele#Nagpur news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
62
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
134
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
24
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com