India Mornings
India Morning
Global News Portal
Monday, April 20, 2026
Loading latest news...
News21 February 202618 views

नागपुरात बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ

R
Rutuja
Published in General
नागपुरात बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ

नागपुरात बारावीच्या फिजिक्स-केमिस्ट्री प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल; पोलिसांकडून सखोल तपास, मंत्री पंकज भोयर यांचा कडक इशारा.

पोलिसांकडून सखोल तपास, मंत्री भोयर यांचा कडक इशारा

नागपूर : शहरातील बारावीच्या बोर्ड परीक्षेदरम्यान फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांचे पेपर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका फिरत असल्याचे समोर आल्यानंतर शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सदर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवण्यात आला असून तपासाला वेग देण्यात आला आहे.

राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी या घटनेची तातडीने दखल घेत सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पेपर फुटीमागील कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.प्राथमिक माहितीनुसार, काही विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या व्हॉट्सअ‍ॅप गटावर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच संबंधित विषयांचे प्रश्नपत्र शेअर करण्यात आले. या प्रकरणात दोन विद्यार्थ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून, खासगी कोचिंगशी संबंधित व्यक्तीमार्फत पेपर मिळाल्याची शक्यता तपासली जात आहे.

पोलिसांनी संबंधितांचे मोबाईल जप्त करून डिजिटल फॉरेन्सिक तपास सुरू केला आहे. प्रश्नपत्रिका नेमक्या कुठून बाहेर आल्या, त्या किती जणांपर्यंत पोहोचल्या आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा बारकाईने शोध घेतला जात आहे. परीक्षा केंद्राशी किंवा विभागीय यंत्रणेशी संबंधित कुणी गुंतले आहे का, याचीही चौकशी सुरू आहे.

दरम्यान, परीक्षेदरम्यान संशयास्पद हालचाली लक्षात आल्याने पर्यवेक्षकांनी चौकशी केली आणि त्यातूनच हा प्रकार उघड झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर शिक्षण विभागाने तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.या संपूर्ण प्रकारामुळे बोर्ड परीक्षांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाकडून पुढील काळात अधिक कडक उपाययोजना केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Tags:#Nagpur news#HSC Exam 2026#Paper Leak Case#Pankaj Bhoyar#maharashtra education

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
137
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
79
Read More →

High alert after Trump’s warning, Americans told to leave 14 Nations

Fighting between the United States and Iran has become very serious.

Mar 3, 2026
31
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
नागपुरात बारावीच्या प्रश्नपत्रिका फुटल्याने खळबळ - India Morning