India Mornings
India Morning
Global News Portal
Tuesday, January 20, 2026
Loading latest news...
News15 January 202612 views

मनपा निवडणूक टक्केवारी: नागपूर 41%, मुंबई कमी, कोल्हापूर आघाडीवर

R
Rutuja
Published in General
मनपा निवडणूक टक्केवारी: नागपूर 41%, मुंबई कमी, कोल्हापूर आघाडीवर

महाराष्ट्र मनपा निवडणूक मतदान टक्केवारी

नागपूर- राज्यात 9 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर घेण्यात आलेल्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी आज मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांनी हळूहळू हजेरी लावण्यास सुरुवात केली. नागपूर महानगरपालिकेत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.23 टक्के मतदानाची नोंद झाली असून, शहरात मतदानाचा प्रतिसाद मध्यम स्वरूपाचा राहिला.

नागपूरमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला मतदार तसेच पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव्या मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. काही ठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात गर्दी वाढली, मात्र दिवसभराचा विचार करता अपेक्षित मतदानाचा आकडा गाठता आला नसल्याचे चित्र आहे.दरम्यान, मुंबई महानगरपालिकेत दुपारी 3.30 वाजेपर्यंत 41.08 टक्के मतदान झाले. कुलाबा परिसरातील वॉर्ड क्रमांक 227 मध्ये केवळ 15.73 टक्के मतदानाची नोंद झाल्याने कमी मतदानाची चर्चा सुरू आहे. पुण्यातही मतदानाचा कल कमी राहिला असून, पुणे महापालिकेत 36.95 टक्के, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 40.50 टक्के मतदान झाले आहे.

राज्यातील इतर महापालिकांमध्ये कोल्हापूरने सर्वाधिक मतदानाची नोंद केली असून येथे 50.85 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय परभणी (49.16 टक्के), अहिल्यानगर (48.49 टक्के) आणि इचलकरंजी (46.23 टक्के) या शहरांमध्येही तुलनेने चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे.

सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार असून, त्यानंतर अंतिम मतदान टक्केवारी स्पष्ट होणार आहे. मात्र, एकूणच 9 वर्षांनंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये राज्यभर मतदानाचा उत्साह अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याचे स्पष्ट होत आहे.

Tags:##मतदान टक्केवारी##नागपूर मतदान##मुंबई मतदान

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
18
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
32
Read More →

दूसरी बार दूल्हा बनेंगे शिखर धवन, फरवरी में सोफी शाइन से रचाएंगे विवाह

पूर्व भारतीय क्रिकेटर शिखर धवन फरवरी 2026 में गर्लफ्रेंड सोफी शाइन से दिल्ली-एनसीआर में दूसरी शादी करने जा रहे हैं।

Jan 6, 2026
55
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com