India Mornings
India Morning
Global News Portal
Sunday, April 19, 2026
Loading latest news...
News25 February 202622 views

मुंबई महापालिकेच्या शिक्षण अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

R
Rutuja
Published in General
मुंबई महापालिकेच्या शिक्षण अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई महापालिकेचा 4,248.08 कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प जाहीर. डिजिटल, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर.

डिजिटलसह गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकाने आर्थिक वर्ष 2026-27 साठी शिक्षण विभागाचा 4,248.08 कोटी रुपयांचा भरीव अर्थसंकल्प जाहीर करत विद्यार्थ्यांसाठी विविध महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. तब्बल पाच वर्षांनंतर नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधीमार्फत सादर झालेल्या या अर्थसंकल्पामुळे मुंबईतील शैक्षणिक व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असल्याचे चित्र आहे.

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला. शिक्षणाच्या गुणवत्तेला गती देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचा स्पष्ट प्रयत्न यामधून दिसून येतो. मोफत शालेय साहित्य, इंग्रजी भाषेतील प्राविण्य वाढवण्यासाठी भाषा प्रयोगशाळा, विज्ञान पार्क, सायबर साक्षरता प्रशिक्षण आणि प्रयोगशाळांचे आधुनिकीकरण अशा विविध उपक्रमांचा समावेश करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेलाही यंदाच्या अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. POCSO कायदा, अमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि इतर सुरक्षा विषयांवर जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. गणित आणि विज्ञान विषयातील प्रगतीसाठी विशेष उपक्रम हाती घेतले जाणार असून डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी आधुनिक वर्गखोल्या आणि तंत्रज्ञानाधारित साधनांवर खर्च वाढवण्यात आला आहे.

शाळांच्या पायाभूत सुविधांमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. नवीन शाळा इमारती उभारणे, जुन्या इमारतींची दुरुस्ती, शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवणे आणि अत्याधुनिक बैठक व्यवस्था उपलब्ध करून देणे या कामांना गती दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या मोफत बस प्रवासासाठीही निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

याशिवाय गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दहावीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांचा पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च महापालिका उचलणार आहे. ग्रंथालयांचे अद्ययावतीकरण, संगीत साहित्य, पर्यावरण विषयक उपक्रम, क्रीडा सुविधा आणि कला उत्कृष्टता केंद्रांची स्थापना अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला बळ मिळणार आहे.

एकूणच, या भरीव अर्थसंकल्पातून मुंबईतील शिक्षण व्यवस्थेला डिजिटल, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण बनवण्याचा महापालिकेचा निर्धार स्पष्ट झाला असून विद्यार्थ्यांसाठी हा अर्थसंकल्प दिलासादायक आणि भविष्योन्मुख ठरणार आहे.

Tags:#BMC Education Budget#Mumbai Education News#BMC Budget 2026-27#Digital Education Mumbai#Free School Facilities

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
134
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
76
Read More →

High alert after Trump’s warning, Americans told to leave 14 Nations

Fighting between the United States and Iran has become very serious.

Mar 3, 2026
29
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
मुंबई महापालिकेच्या शिक्षण अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा - India Morning