India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, February 6, 2026
Loading latest news...
News6 February 20267 views

नागपूरमध्ये महिंद्राची १५ हजार कोटींची गुंतवणूक; विदर्भात उभा राहणार भव्य ऑटोमोबाईल हब

R
Rutuja
Published in General
नागपूरमध्ये महिंद्राची १५ हजार कोटींची गुंतवणूक; विदर्भात उभा राहणार भव्य ऑटोमोबाईल हब

महिंद्रा अँड महिंद्रा नागपूरमध्ये १५ हजार कोटींची गुंतवणूक करणार. विदर्भात ऑटोमोबाईल हब उभारून हजारो रोजगार निर्माण होण्याची शक्यता.

नागपूर : ‘अ‍ॅडव्हान्टेज विदर्भ – खासदार औद्योगिक महोत्सव’दरम्यान राज्य सरकार आणि महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला. या करारानुसार नागपूरमध्ये सुमारे १५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून, यामुळे विदर्भाच्या औद्योगिक नकाशावर ऐतिहासिक बदल घडण्याची शक्यता आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी पुढील दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने होणार असून, २०२८ पासून उत्पादन सुरू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागपूरमध्ये उभारल्या जाणाऱ्या एकात्मिक ऑटोमोबाईल संकुलात पारंपरिक वाहने, इलेक्ट्रिक वाहने तसेच ट्रॅक्टर निर्मितीचे स्वतंत्र विभाग असतील.

या प्रकल्पासाठी नागपूर परिसरात सुमारे १,५०० एकर जमीन देण्यात येणार आहे. यासोबतच संभाजीनगर येथे १५० एकरांवर सप्लायर पार्क उभारण्यात येणार असून, पुढील टप्प्यात इगतपुरी भागात ३०० एकरांवर त्याचा विस्तार केला जाणार आहे. या गुंतवणुकीमुळे हजारो थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील उद्योगस्नेही धोरणे आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका यामुळेच हा प्रकल्प राज्यात येत असल्याचे महिंद्रा अँड महिंद्राचे वरिष्ठ अधिकारी राजेश जेजुरीकर यांनी सांगितले. या करारासाठी मोलाची भूमिका बजावणाऱ्या असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंटचे अध्यक्ष आशिष काळे यांच्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य वित्तीय सल्लागार कौस्तुभ धावसे, उद्योग सचिव पी. अन्बलगन तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात विदर्भात होत असलेल्या मोठ्या गुंतवणुकीचे स्वागत करत, आशिष काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे विशेष उल्लेख केला.

Tags:#Mahindra Investment Nagpur#Vidarbha Auto Hub#Maharashtra Industrial Development#Electric Vehicle Manufacturing#Tractor Manufacturing India

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
28
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
56
Read More →

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Jan 18, 2026
23
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com