India Mornings
India Morning
Global News Portal
Thursday, March 12, 2026
Loading latest news...
News12 March 202611 views

मुलींसाठी ‘लेक लाडकी’ योजना ठरतेय आधार; जन्मानंतर ५ हजार, १८ वर्षांनी मिळणार १ लाख १ हजार रुपये!

P
Puja Nitnaware
Published in General
मुलींसाठी ‘लेक लाडकी’ योजना ठरतेय आधार; जन्मानंतर ५ हजार, १८ वर्षांनी मिळणार १ लाख १ हजार रुपये!

राज्य शासनाने १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे.

सोलापूर : मुलींच्या शिक्षणाचा खर्च अनेक कुटुंबांसाठी मोठे आव्हान ठरत असल्याने अनेक मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागत होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने १ एप्रिल २०२३ पासून ‘लेक लाडकी’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत केली जात आहे.

या योजनेअंतर्गत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील १२ हजार ४८३ मुलींना लाभ मिळाला आहे. लाभार्थी मुलींच्या खात्यात पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी ५ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.

योजनेनुसार पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांतील मुलींना जन्मापासून १८ वर्षांपर्यंत एकूण १ लाख १ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही रक्कम पाच वेगवेगळ्या टप्प्यांत थेट बँक खात्यात जमा केली जाते.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी मुलीचा जन्म महाराष्ट्रात झालेला असावा तसेच कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. एका कुटुंबातील फक्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.

अर्ज करताना मुलीचा जन्मदाखला, पालकांचे आधारकार्ड, रेशनकार्ड, रहिवासी दाखला, बँक पासबुकची प्रत आणि दुसऱ्या अपत्यानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात सर्वाधिक सुमारे ८०० कुटुंबांनी या योजनेचा लाभ घेतल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

योजनेतील आर्थिक टप्पे

जन्मानंतर : ५,००० रुपये

पहिली इयत्ता : ६,००० रुपये

सहावी इयत्ता : ७,००० रुपये

अकरावी इयत्ता : ८,००० रुपये

१८ वर्ष पूर्ण झाल्यावर : ७५,००० रुपये (शिक्षण सुरू असल्याचा पुरावा आवश्यक)

या योजनेमुळे मुलींच्या शिक्षणाची चिंता काही प्रमाणात कमी होत असून त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळत आहे. पात्र पालकांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडे अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Tags:#Lek Ladki scheme#For girls#Solapur news#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
113
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
64
Read More →

High alert after Trump’s warning, Americans told to leave 14 Nations

Fighting between the United States and Iran has become very serious.

Mar 3, 2026
11
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
मुलींसाठी ‘लेक लाडकी’ योजना ठरतेय आधार; जन्मानंतर ५ हजार, १८ वर्षांनी मिळणार १ लाख १ हजार रुपये! - India Morning