India Mornings
India Morning
Global News Portal
Wednesday, April 15, 2026
Loading latest news...
News17 February 202624 views

राज्यातील वाईन उद्योगावर आयात शुल्क कपातीची टांगती तलवार; शेतकरीहितासाठी संतुलित निर्णयाची मागणी

P
Puja Nitnaware
Published in General
राज्यातील वाईन उद्योगावर आयात शुल्क कपातीची टांगती तलवार; शेतकरीहितासाठी संतुलित निर्णयाची मागणी

केंद्र सरकार वाईनवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील वाईन उद्योगात अस्वस्थता वाढली आहे.

नाशिक : केंद्र सरकार वाईनवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चेमुळे राज्यातील वाईन उद्योगात अस्वस्थता वाढली आहे. सध्या सुमारे १५० टक्के असलेले आयात शुल्क काही देशांसाठी २० टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. असे झाल्यास परदेशी वाईन, वोडका आणि शॅम्पेन भारतीय बाजारात तुलनेने स्वस्त दरात उपलब्ध होतील. मात्र याचा थेट परिणाम स्थानिक उत्पादक आणि द्राक्ष शेतकऱ्यांवर होईल, अशी भीती उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात वाईन आयातीसंदर्भात चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. त्याचबरोबर युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युनायटेड किंगडम यांसारख्या देशांबरोबरही शुल्क कपातीचा विचार सुरू असल्याची माहिती आहे. या संभाव्य करारांमुळे आयातीत वाईनचा ओघ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघ चे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, भारतात तयार न होणाऱ्या प्रीमियम आणि अप्पर प्रीमियम श्रेणीतील महागड्या वाईन स्वस्त झाल्यास त्याचे स्वागतच आहे. मात्र ५ ते २० डॉलर किंमतीच्या वाईनवर मोठी शुल्क कपात झाली, तर देशांतर्गत उद्योगास गंभीर फटका बसू शकतो. “द्राक्ष शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकली पाहिजे. स्थानिक शेतकरी सुरक्षित राहिला पाहिजे,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.

नाशिकसह राज्यातील द्राक्ष पट्ट्यावर या निर्णयाचा मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे स्वस्त वाईनवरील १५० टक्के आयात शुल्क कायम ठेवावे, अशी महासंघाची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्यासह काही खासदारांचे शिष्टमंडळ अमित शाह आणि पियुष गोयल यांची भेट घेऊन शेतकरीहिताचे मुद्दे मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

वाईन उद्योगाचा विस्तार आणि स्थानिक शेतीचे संरक्षण यामध्ये समतोल राखणारे धोरण केंद्र सरकारने स्वीकारावे, अशी भूमिका उद्योग क्षेत्रातून मांडली जात आहे. आयात शुल्कातील संभाव्य बदलामुळे राज्यातील वाईन उद्योग आणि द्राक्ष उत्पादकांच्या भवितव्याबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags:#Wine industry#Import duty#Farmers welfare#Nashik News#Maharashtra news

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
62
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
134
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
24
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com
राज्यातील वाईन उद्योगावर आयात शुल्क कपातीची टांगती तलवार; शेतकरीहितासाठी संतुलित निर्णयाची मागणी - India Morning