India Mornings
India Morning
Global News Portal
Saturday, February 21, 2026
Loading latest news...
News21 February 20267 views

सावधान; लव्ह मॅरेज नोंदणीवर नवे बंधन,पालकांना व्हाट्सअँपद्वारे तात्काळ सूचना मिळणार

R
Rutuja
Published in General
सावधान; लव्ह मॅरेज नोंदणीवर नवे बंधन,पालकांना व्हाट्सअँपद्वारे तात्काळ सूचना मिळणार

गुजरातमध्ये लव्ह मॅरेज नोंदणीसाठी नवे नियम प्रस्तावित; अर्ज होताच पालकांना व्हाट्सअँपद्वारे सूचना देण्याची तरतूद.

अहमदाबाद : प्रेमविवाहाच्या नोंदणी प्रक्रियेत मोठे बदल करण्याचा प्रस्ताव गुजरात सरकारने पुढे आणला असून, अर्ज दाखल होताच मुलीच्या पालकांना व्हाट्सअँपद्वारे तात्काळ सूचना पाठवण्याची तरतूद करण्यात आली आहे. 2006 च्या विवाह नोंदणी कायद्यात सुधारणा करण्यासाठी हा प्रस्ताव गुजरात विधानसभेत मांडण्यात आला आहे. नियम 44 मध्ये बदल सुचवण्यात आले असून, त्यावर नागरिकांकडून 30 दिवसांत हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या आहेत.

या संदर्भात गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, मुलींचे संरक्षण आणि विवाह प्रक्रियेत पारदर्शकता वाढवणे हा या बदलांचा मुख्य उद्देश आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे किंवा पालकांना अंधारात ठेवून होणाऱ्या विवाहांना आळा बसावा, यासाठी नियम अधिक कठोर करण्यात येत आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.

नव्या तरतुदीनुसार विवाह नोंदणीसाठी अर्ज करताना संबंधित जोडप्याने पालकांना विवाहाबाबत माहिती दिल्याचे स्व-घोषणापत्र सादर करणे आवश्यक असेल. तसेच वधू-वरांच्या कागदपत्रांसह त्यांच्या पालकांचे ओळखपत्र आणि संपर्क तपशील देणेही बंधनकारक राहणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाईल आणि ठरावीक कालावधीनंतर विवाह प्रमाणपत्र जारी केले जाईल.

प्रशासकीय पातळीवरही बदल सुचवण्यात आले आहेत. आतापर्यंत विवाह नोंदणीची प्रक्रिया प्रामुख्याने तलाठ्यांकडे होती; मात्र पुढे अर्ज स्वीकृती आणि प्राथमिक तपासणीपुरती त्यांची भूमिका राहील. अंतिम मान्यता देण्याचा अधिकार तालुका स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे असेल. तसेच नोटरीकरणाच्या प्रक्रियेतही कडक अटी घालण्यात आल्या असून, पक्षकारांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच स्वाक्षरी आणि शिक्का मारणे आवश्यक राहणार आहे.या सर्व बदलांमुळे प्रेमविवाह नोंदणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि नियंत्रित होणार असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे; तर दुसरीकडे या प्रस्तावावर नागरिकांकडून येणाऱ्या प्रतिक्रिया काय असतील, याकडेही लक्ष लागले आहे.

Tags:#Gujarat news#Love Marriage Registration#Marriage Registration Rules#Harsh Sanghavi#Gujarat Assembly

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
90
Read More →

First-Ever Sunday Budget: Sitharaman to Present on Feb 1

Finance Minister Nirmala Sitharaman will present the Union Budget 2026-27 on Sunday, February 1, marking the first-ever Sunday budget in India.

Jan 9, 2026
58
Read More →

महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिकची भूमी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे वर्ल्ड इकोनॉमिक फोरमसाठी आज झ्युरिक येथे आगमन झाले. 5 दिवसांच्या आपल्या या दौऱ्यासाठी येताच मराठमोळ्या पद्धतीने त्यांचे उत्स्फूर्त पद्धतीने स्वागत करण्यात आले.

Jan 18, 2026
25
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com