India Mornings
India Morning
Global News Portal
Friday, April 17, 2026
Loading latest news...
News17 April 20265 views

ड्रग्स रोखण्यात सरकार अपयशी? “पोलिसांना फ्री हँड द्या”; अमित ठाकरे यांचा संताप

T
Tanay
Published in General
ड्रग्स रोखण्यात सरकार अपयशी? “पोलिसांना फ्री हँड द्या”; अमित ठाकरे यांचा संताप

अमित ठाकरे यांचा सरकारवर हल्ला; ड्रग्स थांबवण्यासाठी पोलिसांना फ्री हँड देण्याची मागणी.

पुणे : मुंबईतील ड्रग्स प्रकरण, नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतर आणि लैंगिक छळाच्या घटनांवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारला थेट प्रश्न विचारत, “ड्रग्स थांबवण्याची ताकद सरकारमध्ये नाही का?” असा जळजळीत सवाल केला.

राज्यात वाढत्या ड्रग्स तस्करीबद्दल संताप व्यक्त करत ठाकरे म्हणाले की, “प्रत्येक शहरात ड्रग्स सापडत आहेत, विकले जात आहेत. हे थांबवण्यासाठी ठोस कारवाई का होत नाही? शाळांच्या परिसरातसुद्धा ड्रग्स विकले जात आहेत, ही अत्यंत भीषण बाब आहे.” त्यांनी या प्रकरणात कठोर शिक्षा देण्याची मागणी करत, “अशा आरोपींना सगळ्यात कठोर शिक्षा झाली पाहिजे,” असे ठामपणे सांगितले.

पोलिसांना अधिक अधिकार देण्याची मागणी करत ते म्हणाले, “पोलिसांना २४ तासांसाठी फ्री हँड दिल्यास गुन्हेगारांवर आळा बसेल. सरकारने पोलिसांवर विश्वास ठेवून त्यांना मोकळीक द्यावी.” त्यांनी पुढे असेही म्हटले की, “जर आम्ही सत्तेत असतो, तर अशा आरोपींना थेट फाशीची शिक्षा दिली असती आणि एक उदाहरण निर्माण केले असते.”

संघटनात्मक कामांबाबत बोलताना ठाकरे यांनी सांगितले की, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यभर संपर्क अध्यक्ष नेमले असून, लवकरच कार्यकर्त्यांशी ‘वन-टू-वन’ संवाद साधला जाणार आहे. “आम्ही २५ आणि २६ एप्रिलला ग्रामीण भागात जाऊन कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहोत. त्यानंतर सविस्तर अहवाल तयार करून राज ठाकरे यांना सादर करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ड्रग्स प्रकरणावरून सरकारला लक्ष्य करत त्यांनी प्रश्न उपस्थित केला की, “इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स राज्यात येतात कुठून? याचे अचूक आकडे सरकारकडे नाहीत का?” त्यांनी सर्व कंपन्यांचे १०० टक्के ऑडिट करण्याची मागणी करत, “आपल्या कंपनीत कोण काम करतं, याची जबाबदारी व्यवस्थापनाने घ्यायला हवी,” असेही नमूद केले.

“प्रशासनाने ही समस्या गांभीर्याने हातात घेतली पाहिजे. आम्ही रस्त्यावर उतरणारच आहोत, पण सरकारने ठोस कारवाई करणे गरजेचे आहे,” असा इशारा देत ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला.

Tags:##AmitThackeray#DrugsIssue##MaharashtraPolitics#PoliceFreeHand#CrimeControl

Want to Grow Your Business?

Partner with India Morning and reach thousands of readers daily.

Contact us for Ads
Email: indiamorning01@gmail.com

Recommended Stories

मकरसंक्रांतीच्या आनंदावर विरजण; वैनगंगा नदीत बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त नदीवर फिरायला गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. क्षितिज लिलाधर लांजेवार असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो तुमसर तालुक्यातील तामसवाडी येथील रहिवासी होता.

Jan 14, 2026
64
Read More →

सीमेपलीकडचं युद्धही वास्तव; नागपुरातून राजनाथ सिंह यांचा ठाम इशारा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नागपूर दौऱ्यात नितीन गडकरी यांची भेट, खासगी संरक्षण उद्योगांवर सरकारचा विश्वास अधोरेखित

Jan 19, 2026
136
Read More →

नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरचा पुन्हा दमदार पराक्रम; ‘डबल महाराष्ट्र केसरी’चा किताब पटकावला

पुण्यातील वाघोली येथे पार पडलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडचा पराभव करत मानाची ‘महाराष्ट्र केसरी’ चांदीची गदा जिंकली.

Mar 23, 2026
28
Read More →
Contact us for Ads: indiamorning01@gmail.com